ब्रेकिंग न्यूज़–*24 मधपी सह तीन दुकानरांवर राज्य उत्पादन शुल्क व सावनेर पोलिसांची संयुक्त कारवाई

ब्रेकिंग न्यूज़

*24 मधपी सह तीन दुकानरांवर राज्य उत्पादन शुल्क व सावनेर पोलिसांची संयुक्त कारवाई

*मधपी मधे खळबळ*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेर : सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्थानक परिसरातील नगर पालीकेच्या व्यवसाईक गाळ्यात असलेल्या काही हाँटल मधे बसून मधपान करण्याची सोय संचालक उपलब्ध करुण देत असल्याचे खात्रीलायक वु्त्त राज्य उत्पादन शुल्क दारू बंदी विभाग व सावनेर पोलिसांना कळताच दोन्ही विभागाद्वारे दि.12-12-2019 ला सायंकाळी 8-00चे दरम्यान संयुक्त रीत्या कारवाई करुण एकूण 21 मधपी व तीन संचालकांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई करण्यात आली*
*मिळालेल्या माहितीनुसार सावनेर शहरातील हॉटेल अंबिका भोजनालय, क्रिश भोजनालय व कमाले भोजनालय या सार्वजनिक ठिकाणी मद्यपीना सेवा पुरविली जात असल्याची माहिती मिळाल्या वरुन राज्य उत्पादन शुल्क व सावनेर पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून 3 हॉटेल मालक व 21 मद्यपी वर कारवाई केली. या मध्ये 13 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.*
*सदरची कारवाई पोलीस स्टेशन सावनेर चे निरीक्षक *अशोक कोळी व मुरलीधर कोडापे यांनी ही कारवाई केली. या वेळी हॉटेल मालक (१) रामकुमार बसवाल (२) चित्रसेन कमाले व (३) नोकर महेंद्र वर्मा तसेच मद्यपान करणारे मधपी (४) अमित काळे (५) नामदेव फोझरे (६) पंकज चौकसे (७) हरीश अग्रवाल (८) पवन परतेकी (९) अक्षय चरडे (१०) अजय मधोरिया (११) अमित शाम कुवर (१२) लक्ष्मण वझाडे (१३) निखिल येटे (१४) सुरेंद्र मुखींया (१५) रफिक खान (१६) कपिल गोंडाने (१७) तिलक गोलाईत (१८) सोनू निकोसे (१९) मनोज कोकर्डे (२०) दादाराव बावने (२१) विनोद लाडसे (२२) सुधाकर टेकाम (२३) रामानंद विशवकर्म (२४) कंचन सावरकर इत्यादी वर दारुबंदी कायद्या नुसार गुन्हे नोंदवून वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यपान केलेचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले असून दिनांक १३ डिसेंम्बर २०१९ रोजी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत*
*सदरची कारवाई मा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशा नुसार संयुक्त मोहीम राबविण्यात आली.*
*सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क दारू बंदी विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे, मुरलीधर कोडापे, दुय्यम निरीक्षक बाळू भगत, मुकुंद चिटमटवार, व पोलीस स्टाफ तसेच जवान, अमोल बोथले,मिलिंद गायगवळी, रवींद्र इंगवले, आशिष वाकोडे व जवान नि वाहन चालक रवी निकाळजे, सुभाष शिंद सावनेर पो.स्टे चे पीएसाय सागर कारंडे,हे.का.विजय पांडे,सुधिर यादगीरे,आदींनी भाग घेतला, व मोहीम यशस्वी केली.*
*सदरच्या कारवाई मुळे हाँटेल,ढाबे,टपरीवर मधपाण करणार्यांचे धाबे दनानले असुन अश्या प्रकारच्या कारवाई सातत्याने सुरू राहतील अशी माहिती पोलीस निरिक्षक अशोक कोळी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक रावसाहेब कोरे यांनी दीली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …