*बी आर हाय. सह. पत संस्था अध्यक्षपदी धीरज ढोले अविरोध*
*नव नियुक्त कार्यकारणी ५ वर्षाकरिता जाहीर*
काटोल प्रतिनिधी- दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – बनारसीदास रुईया शाळेच्या सहकारी पत संस्थे च्या अध्यक्षपदी धीरज आण्णाजी ढोले यांची अविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेची अकरा सभासदांची कार्यकारिणी सन 2022 ते 2027 कालावधी करिता निवडल्या गेली यात उपाध्यक्ष भजराजन् गिरधारी चंदन,
मानद सचिव नारायण धनराज कावडकर,कोषाध्यक्ष श्रीकृष्ण जयदेव रानोटकर,
सदस्य गणात विजय जगतराम चौधरी, हेमंत दयाराम घोरसे, सागर गोपीचंद ढोके, हिरामण श्यामराव सोमकुवर,राधा रमेशसिंग चव्हाण,हर्षाली नामदेव थोटे, नयना सुरेश दुधकवरे आदींचा समावेश आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज ढोले व कार्यकारिणीचे शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ गोविंद भुतडा, सचिव जवाहरलाल चांडक, प्राचार्य संध्या टावरी,उप प्राचार्य विजय राठी, पर्यवेक्षिका ,प्रधान मॅडम,वंदना काळे , माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, ला भू पत संस्था कोंढाळी अध्यक्ष सुधीर बुटे, संदीप वंजारी, संदीप धिरडे,आदित्य धवड आदींनी अभिनंदन केले आहे. पतसंस्थेत शिक्षक व कर्मचारी एकूण सभासद संख्या 57 असून भागभांडवल, गुंतवणूक वाटचाल प्रगतीपथावर आहे.