*महदी नगर खापरी येथे जश्ने ताज महदी महोत्सव १४ ते १७ जानेवारी पर्यंत*

*महदी नगर खापरी येथे जश्ने ताज महदी महोत्सव १४ ते १७ जानेवारी पर्यंत*

कोंढाळी प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग (53), खापरी (बारावकर) येथील महदी नगर खापरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही 14 जानेवारी रोजी *हजरत ताज महदी भव्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे.जश्नेताज महदी महोत्सवानिमित्त कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनासाठी नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, अरविंद बँकेचे अध्यक्ष- डॉ.आशिष देशमुख, काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समिती सदस्य अरुणराव उईके, सरपंच-बाबाराव ताकतोडे (खापरी), सुधीर गोतमारे (खुर्सापार), केशवराव धुर्वे (कोंढाळी), उपसरपंच-स्वप्नील व्यास, (कोंढाळी), नागोराव हिंगवे (खापरी), ललित मोहन काळबांडे (माजी उपसरपंच कोंढाळी), ग्रा पं सदस्य संजय राऊत (कोंढाळी) सामाजिक कार्यकर्ते समीर ठवळे, दुर्गाप्रसाद पांडे, शशिकांत भांगे यांच्या उपस्थितीत जश्नेताज महदी महोत्सवाला सुरुवात झाली.
या वेळी – वहीद हैरां (नागपूर), इम्रान आलम (अकोला), अली जान (हजारीबाग), आफरीन-सुलताना (कर्नाटक), फैजानशैदा (अमरावती), आणि सानिया ताज (झांशी) आदींनी बाबा ताज महदीच्या आदरप्रित्यर्थ कव्वाल गायन केले.

महदी नगर खापरी येथे या धार्मिक उत्सवानिमित्त 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान पूजा, भजन, संकीर्तन, सांस्कृतिक, कव्वाली आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच प्रशासक ताजमहदी दरबार यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जानेवारी रोजी सकाळी 08:00 वाजल्यापासून महाप्रसाद वाटप, पूजा संपल्यानंतर जश्नेतज उत्सवाची समाप्ती अशी माहिती देण्यात आली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …