*खेळ हे विधार्थ्याचे सर्वाणगीण विकास साधणारे माध्यम – संतोष सोनटक्के*
*कोंढाळी बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न*
कोंढाळी प्रतिनिधी-
कोंढाळी – विधार्थी जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्व असून विधार्थयानि विधार्थी जीवनात खेळ प्रत्येकांनी अंगिकार्ला पाहिजे कारण खेळामुळे विधार्थयाचा शारीरिक मानसिक, बौद्धिक, भावनिक अशा सर्वाणगीण विकास होतो त्याच प्रमाणे विधार्थयानि लहानपणापासून खेळ खेळला तर खेळाला वयाचे बंधन राहत नाहीआरोग्य सुदृढ राहण्याकरिता खेळ हे अविभाज्य अंग आहे असे मार्गदर्शन त्रिमुर्ती विधालय दुधाळा येथे आयोजित कोंढाळी जि प शाळा बिट स्तरीय खेळस्पर्धा व सावस्क्रुतीक महोत्सव उदघाटन प्रसंगी गट शिक्षण अधिकारी प समिती काटोल संतोष सोनटक्के यांनी केले कोंढाळीबीट अंतर्गत मासोद , खुर्सापार व कोंढाळी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकरिता बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 जानेवारी 2023 ला त्रिमूर्ती विद्यालय दुधाळा येथे करण्यात आले.
यात तीन्ही केंद्रातील पंधरा शाळा व 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक स्पर्धेत पुसागोंदी व कोंढाळी क्रमांक १ या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला तर दुधाळा ,मिनीवाडा मसाळा व चंदनपार्डी या शाळा उपविजेत्या ठरल्या. क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी (मुली )दुधाळा शाळा, कबड्डी( मुले) चंदनपार्डी शाळा, लंगडी चिखली शाळा, रिले धोतीवाडा व खुर्सापार शाळा, कनिष्ठ कबड्डी दुधाळा शाळा विजयी झाल्या. विजयी चमूचे केंद्रप्रमुख श्री निळकंठ लोहकरे व श्री रमेश गाढवे यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षिस वितरण श्री संतोष सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती काटोल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नरेश भोयर , विस्तार अधिकारी पंचायत समिती काटोल श्री. नंदकिशोर सरोदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुधाळा, श्री संजय एण्डेल, सदस्य त्रिमूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र नागपुरे , , ठाणेदार कोंढाळी पंकज वाघोडे यांची उपस्थिती होती.क्रीडा शिक्षक श्री खामकर , त्रिमूर्ती विद्यालयातील संपूर्ण स्टाफ व मैदान समिती यांनी स्पर्धेकरिता मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे संचालन श्री दिलीप चौके यांनी केले.जी. प.शाळा दुधाळा यांनी विद्यार्थ्यांना उत्तम भोजन दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीन्ही केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.