*बाजार समिती निवडणुकीत केदार गटाचे बिनविरोध वर्चस्व*
सावनेर : महाराष्ट्रभर बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.त्यात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येण्यासाठी उत्सुक आहेत.तसे उत्सुकतेचे वातावरणही तापले आहे.*
*बाजार समिती निवडणूक प्रक्रियेसाठी आज, 20 एप्रिल 2023 रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी केवळ 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, ज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुणवंता चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्व 18 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.व सुनील बाबू आगे बढोच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले*
*बाजार समीतीच्या या निवडणुकीत निर्वीरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सावनेर पंचायत समितीच्या सभापती अरुणाताई शिंदे, उपसभापती राहुल तिवारी, ज्येष्ठ समाजसेवक बैजनाथ डोंगरे,पुर्व उपसभापती प्रकाश पराते आदिने सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.*
*सहकार महर्षी स्व. बाबासाहेब केदार यांनी नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील सहकार क्षेत्रामध्ये घातलेला पाया इतका भक्कम आहे की तो भेदण्यात भाजप नेहमीच अपयशी ठरला आहे.माजी मंत्री व परिसराचे आमदार सुनील केदार ही तोच पॅटर्न निर्दोषपणे पाळत आहेत.त्यामुळे सहकार क्षेत्राच्या प्रत्येक आघाडीवर ते यशस्वी आहेत.तसेच ग्रामीण,शेतमजूर,शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाण आहे.आणि त्या सोडवण्यासाठी सुनील बाबू सतत प्रयत्नशील राहतील असे मनोहर कुंभारे म्हणाले.*
*बाजार समितीत बिनविरोध आलेल्या उमेदवारांमध्ये सूरज नवले, मयूर जिचकार, चंद्रशेखर कुंभलकर, सुभाष रहाटे, सुरेश केणे, काशिराव पटे, वैभवी पाटील, मनोरमा चोपडे, अशोक डावरे, दुर्वास लाखे, गुणवंत काळे,रविंद्र चिखले,प्रकाश लांजेवार,प्रविण झाडे, विनोद जैन, जगदीश ठाकूर व श्रावण दुरुगवार यांचा समावेश आहे*