*गडचिरोलीच्या आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड*

*गडचिरोलीच्या आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड*

गढ़चिरोली प्रतिनिधी – सूरज कुकुड़कर

गडचिरोली- बृहन्महाराष्ट्र योग परिषद अमरावतीशी संलग्न गडचिरोली जिल्हा योग असोसिएशन, आरमोरीतर्फे आरमोरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली येथील आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

आरमोरी येथे झालेल्या स्पर्धेत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये अदिती हेमके हिने प्रथम, कावेरी प्यारमवार द्वितीय, तर मुलांमध्ये डेविड जांगी याने प्रथम व प्रज्वल निमगडे याने तृतीय क्रमांक पटकावला. १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये राधिका कलंत्री हिने प्रथम व अनुजा म्हशाखेत्री हिने द्वितीय क्रमांक पटकावला. २५ ते ३५ वयोगटात विशाल भांडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सोबतच ८ ते १३ वयोगटात मोहित वाघरे आणि ३५ ते ५० वर्षे वयोगटात कल्पना म्हशाखेत्री यांचीही या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. हे सर्वजण आज राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता रवाना झाले. १३, १४ व १५ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ येथील बाबासाहेब नांदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.

योग शिक्षक अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …