*मेडिकल हॉस्पिटल नागपूर च्या दुर्घटनेत दगावनार्यांच्या परिवारास दोन लाख रुपयांची मदत*
*आमदार सुनील केदार यांचा पुढाकार*
*मुख्यमंत्री सहयता निधीतून मदत*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः 12 डिसेंबर रोजी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) नागपूर च्या चर्मरोग विभागाचा पोर्ज कोसळून दोघांचा दुर्दैवी अंत झाला होता या मु्तकात सावनेर निवासी देवनाथ रामचंद्र बागडे वय 67 रा.पंचशिल नगर सावनेर यांचा सदर दुर्दैवी दुर्घटनेत मु्त्यू झाला होता सदर घटनेची तात्काळ दखल घेत क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी पिडित परीवारास मुख्यमंत्री सहायता निधीतून लगेच मदत मिळावी करीता पुढाकार घेतल्याने पिडित परीवारास दोन लाख रुपयाची मदत तात्काळ पुरवण्यात आलु*
*सावनेर येथील रहवासी देवनाथ बागडे हे आजारी असल्यामुळे मागील काही दिवसापासून नागपूर मेडिकल हास्पिटल च्या चर्मरोग विभागात उपचार घेत होते.व त्यांच्या प्रकु्तीत सुधारणा होऊण त्यांचा आजार ही बरा होत होता व पुढील दोन तीन दिवसात त्यांना सुट्टी ही मिळणार होती.परंतु काळाला काही औरच मंजूर होते व दि.12 डीसेबर ला सायंकाळच्या दरम्यान पोर्च खाली उभे असतांना अचानक पोर्च तुटून पडल्याची घटना घडली व त्याखाली येऊण त्यांचा दुर्दैवी अंत झाला गरीब कुटुंबावर अचानक दुखाःचा डोंगर कोसळला व हतबल झालेल्या दुखःद परिवारास मदत मिळवून देण्याकरीता क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून बागडे परिवारास दोन लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर करुण देत खर्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत सदर रक्कमेचा धनादेश शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या हस्ते बागडे कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला*
*याप्रसंगी युवा समाजसेवी मनोज बसवार,अश्विन कारोकार,घनश्याम तुर्के,मंडळ अधिकारी राठोर,तलाठी गणेश मोरे,पवन बघोड़ सह बागडे कुटुंब प्रामुख्याने उपस्थित होते*