*श्री संत सीताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न*
*मान्यवरांच्या हस्ते गडकरी संकुल समोर पालखीचे पूजन व लड्डू वाटप*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री संत सीताराम महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यत श्री संत सीताराम महाराज पुण्यतीथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सप्ताहात हभप गुरुवर्य श्री नाना महाराज सूर्यवंशी यांच्या अमृत वाणीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र कथा ऐकन्याचा अनुपम योग नगरवासीयाना लाभालेला आहे. सप्ताहात दैनंदिनी दररोज पहाटे 5 ते 7 काकडा आरती,सकाळी 7:30 ते 8:30 ग्रंथराज ज्ञानेश्वारी पारायण सकाळी 9:30 ते 12 संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा .दुपारी 1 ते 2:30 ज्ञानेश्वारी पारायण. दुपारी 2:30 ते 5:30 श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा. सायंकाळी 6 ते 7:30 हरिपाठ व भारुड. रात्री 8:30 ते 11 हरिकीर्तन.अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे.दिनाक 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता श्रीची पालखी शोभायात्रा नगरीतील मुख्य मार्गानी नगरभ्रमन करण्यात आली.त्याप्रगी गडकरी चोक येथील पाटील सेल्युलर जवळ पालखी शोभयात्रेचे पूजन करण्यात आले.
करुण सायंकाळी 7 वाजता देवस्थानात दीपोत्सव संपन्न झाला दिनांक 11 जानेवारीला सकाळी 11 काल्याचे कीर्तन व माहाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.आयोजित सर्व कार्यक्रमचा समस्त नगरवासियांनी लाभ घेतला.आयोजित संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कमिटेचे अध्यक्ष मनोहरराव फाये,उपाध्यक्ष भालचंद्रराव पाटील, सविच शंकरभाऊ आगलावे,सहसचिव परमानंद नाईक, वसंतराव पाटील, सुभाषराव नाईक, सुभाषराव दिवटे, अतुल पाटील भोयर सर, योगेश पाटील, विजय टेकाडे, रितेश पाटील, बंडू दिवटे, नरेंद्र पाटील, गणेश खोंड़ेकर, मनोहर खोंडे, दत्तू खोंडेकर, सुनील खोंड़ेकर, सुरेंन्द्र काळे, दादा खोंडेकर, नरेंद्र काळे,पंकज सातपुते, कमलाकर खोंड़ेकर, रवी लोडेकर,निलेश वानखेडे, कमलाकर लाड,योगेश वाढबूधे,अशोक बनकर, प्रवीन पुराणिक, रामकृष्ण कडक यांनी परिश्रम घेत आहे.
मान्यवरांच्या हस्ते गडकरी संकुल समोर पालखीचे पूजन व लड्डू वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक साहेबराव विरखरे,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंढेले,उपाध्यक्ष दीपक कटारे,व्यापारी संघाचे अध्यक्ष अतुल पाटील,माजी न से तेजसिंग सावजी,लक्ष्मीकांत दिवटे,जगनाडे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रमेश घटे, प्रा राजेश पवार,के डी पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय चे प्राचार्य डॉ योगेश पाटील,पुरुषोत्तम नाबिरा,रितेश पाटील संजय बावरे,विनोद भक्ते व हेमराज घोडे यावेळी उपस्थीत होते.