सार्वत्रिक आरोग्य दिना निमित्य घोट येथे ३०५ रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी

सार्वत्रिक आरोग्य दिना निमित्य घोट येथे ३०५ रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी


*गढ़चिरोली प्रतिनिधी- सुरज कुकडवार*

सार्वत्रिक आरोग्य दिनानिमित्य प्राथमिक आरोग्य केंद्र घोट ता. चामोर्शी येथे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजणे अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ डिसेम्बर २०१९ रोजी गुरुवारला संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन जिल्हा स्तरावरील योजनेतील अंगीकृत रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय व धन्वंतरी रुग्णालय गडचिरोली यांनी केले .

या शिबिराचे उद्घाटन श्री.विनय बारसागडे साहेब सरपंच घोट यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत कारेकर, डॉ.रोशनी राउत, डॉ.तुषार ढहाके, डॉ.तारकेश्वर उईके, डॉ. भूषण लायबर सर वैद्यकिय अधिकारी घोट, जिल्हा समन्वयक डॉ.प्रिती गोलदार, जिल्हा प्रमुख श्री.लिलाधर धाकडे, डॉ.कृतिका कवाठे जिल्हा वैद्यकिय अधिकारी, डॉ.स्वीटी उंदिरवाडे उपस्थित होते. या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते गोल्डन कार्ड चे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात विविध आजाराच्या ३०५ रुगांची तज्ञ डॉक्टर कडून मोफत तपासणी करण्यात आली. तसेच या शिबिरामध्ये ४४ रुग्ण हे पुढील उपचार व शस्त्रक्रियेकरिता संधर्भीत करण्यात आले त्यात प्रामुख्याने हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, पोटाचे आजार, स्त्री रोग, अस्थीरोग, कर्ण विकार, बालरोग, औषधीशास्त्र इत्यादी आजाराचे रुग्ण होते. या रुगांची उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्तर्गत मोफत करण्यात येणार आहे. ज्यांचे कडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय या प्रकारचे शिधापत्रिका असेल त्या सर्व लाभार्ध्याना १.५ लाखापर्यंत ९७१ गंभीर आजारावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजणे अर्तर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया आहे, तसेच केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना हिलाच मोदी केअर या नावाने ओळखले जाते या योजने अंतर्गत लाभार्थ्यांला ५लाखा पर्यंत च्या १३०० आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत. आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्ध्याकडे गोल्डेन कार्ड असणे अनिवार्य आहे, त्या करिता लाभार्थ्यांचे नाव सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ मध्ये नाव असणे आवश्यक आहेत. तसेच लाभार्थथाकडे प्रधानमंत्री पत्र पाठविलेले आहेत. हे पत्र किंवा रेशन कार्ड सोबत, आधार कार्ड च्या आधारे कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच संलग्नित रुग्णालयात गोल्डन कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेमुळे मुळे सर्व दुर्गम,गरीब,असुरक्षित लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबीर समन्वयक श्री.गणेश मानकर, पर्यवेक्षक मनोज उराडे , पर्यवेक्षक लक्ष्मीकांत वासनिक, आरोग्यमित्र कांचन, प्रितम, बालाजी, मनोज तोरे, श्रीकांत, सचिन, चेतन कालबांदे यांनी मदत केली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …