*प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

सावनेर –  रविवार ला राष्ट्रीय मनोविकास अक्षय क्षेत्रंम शाळा सावनेर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेत ध्वजारोहण श्री. अभिषेकसिंह गहरवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. तुषार भाऊ उमाटे माझी बांधकाम समिती सभापती न. प सावनेर व प्रमुख पाहुणे म्हणून प्लॅनेट आयटी चे संचालक श्री. अभिषेकसिंह गहरवार सर , सौ. सोनालीताई उमाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मदगे मॅडम ग्रामीण रुग्णालय सावनेर, श्री. किशोरजी कुंभारे, श्री. गणेशजी मदगे, श्री. किशोरजी कुंभारे, श्री. सूरज सेलकर, महेशजी कामोने, सौ. रेखाताई पोटभरे, श्री. निखिलजी पोटभरे, श्री. शाळेचे मुख्याध्यपक श्री.परागजी मुसळे, मानसशास्त्रज्ञ शुभांगी केने, प्लॅनेट आय टी चे नताशा देशमुख, संजिता नानवटकर, किरण बसोटिया, तेजस्विनी मिलमिले, भाग्यश्री चाफेकर, नेहा ढवंगळे, संजना वाडबुधे, ईश्वरी लोडेकर, काजल गहरवार, सुप्रिया चांदेकर, आणि संपूर्ण टीम व इतर मान्यवर तसेच पालक व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या शुभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, “या विद्यार्थ्यांना अत्यंत काळजी ची गरज आहे, आणि आमच्या यथाशक्ती नुसार या विद्यार्थी व शाळेमागे भक्कम पणे उभे राहू” असे प्रतिपादन श्री तुषार जी उमाटे यांनी केले. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी चि. आदित्य मधूकर राजुके याचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन बोडे व आभार प्रदर्शन शोभाताई दातीर यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी भोजन व इतर साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …