*टायर फुटल्याने शेतकऱ्यांचे पिकअप वाहन पलटले…एक गंभीर जखमी.*
*पाटणसावंगी टोल नाक्याजवळ घटना*
*शेतमालाचे अतोनात नुकसान*
पाटणसावंगी प्रतिनिधी- अक्षय चिकटे
सावनेर –नागपूर मार्गाने पीकअप वाहन क्र. एम एच ४० बीजी १७०७ या वाहनाने शेतकऱ्यांचा भाजीपाला भरून नेत असताना टोलनाक्या जवळील मोंट फोर्ट आदिवासी वसतिगृहासमोर वाहनाचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटला व वाहन पलटून अपघात झाल्याची घटना शनिवार ला दुपारी १२वाजताच्या दरम्यान घडली.
विक्की लक्ष्मण कानफाडे ,वय २० रा.तिष्टी, ता.कळमेश्वर गंभीर जखमी असून मेयो रुग्णालय नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.
त्यात वाहन चालक विरुभान सूर्यभान पाटील, वय २५, व पवन सुरेश भोंगाडे,वय २८ रा.तिष्टी,ता.कळमेश्वर दोघेही किरकोळ जखमी आहे.
कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी येथून नियमीत शेतकऱ्याचा शेतातील भाजीपाला नागपूर ला कळमना मार्केट येते जात असतात पाटणसावंगी जवळ येताच अचानक टायर फुटल्याने हा अपघात घडला व त्यात हजारो रुपयाचा शेतमाल बेकार झाला.
सदर अपघाताची माहिती कळताच पाटणसावंगी पोलीस चौकी चे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले पुढील पोलिस तपास संदीप नागरे, हेमराज कोल्हे करीत आहे