*सरस्वती महिला महाविद्यालयात दंत चिकित्सा शिबीर संपन्न*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले*
*सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत सरस्वती महिला महाविद्यालयात दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात* *आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता हिवरकर उपस्थित होत्या तर उद्घाटक म्हणून डॉक्टर पौर्णिमा केदार चिंचमलातपुरे लाभलेल्या होत्या आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचे आपल्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊ महाविद्यालयांनी दंत चिकित्सा* *शिबिराचे आयोजन केले विद्यार्थ्यांनी आपल्या या आरोग्यासंबंधी जागृक राहण्याच्या संदेश दिला या शिबिरात प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेल्या डॉक्टर पौर्णिमा {केदार} चिंचमलातपूरे यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या दाताच्या संबंधित हाडाची तसेच तोंडाच्या कॅन्सरची माहिती दिली त्याचप्रमाणे प्रक्षेपणात द्वारे दातांची कशी काळजी घ्यावी याविषयी*
*मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात दाता संबंधित असणाऱ्या समस्येचे तपासणीदरम्यान निराकारण केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सौदामिनी आठवले सामाजिक कार्यकर्त्या यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासात आरोग्याची काळजी कशी महत्वाची असते हे सांगितले* *अध्यक्षस्थानी लाभलेल्या संस्थेच्या संचालिका लता हिवरकर यांनी विद्यार्थ्यांना या शिबिराच्या पुरेपूर लाभ घेऊन आपल्या समस्येचे निराकरण करण्यास सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे आरोग्य* *यासंबंधी संस्था सदैव काळजी घेण्यात राहील काळजी घेण्यास तत्पर राहील असे सांगितले कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा चिंचमलातपूरे , अश्विनी चिंचमलातपूरे* *महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य वैशाली हिवरकर उपस्थित होत्या शिबिराला महाविद्यालयातील बीएससी* *बीकॉम प्रथम वर्षाच्या 150 विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रॉय आणि डॉ. सुवर्णा जांभूळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. जोगी यांनी मानले* *कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्राध्यापक वडसकर प्राध्यापक मगजन प्रा.चुनरिया प्राध्यापक वराडे प्रा.सोनवाणे यांनी सहकार्य केले*