खापरखेड़ा-*रस्ता ओलांडत असतांना कोळशाची रिकामी वॅगन ट्रकवर आढळली*-*ट्रक चालक गंभीर जखमी*

*रस्ता ओलांडत असतांना कोळशाची रिकामी वॅगन ट्रकवर आढळली*

*खापरखेडा औष्णिक वीज केंद्र येथील घटना* 

*ट्रक चालक गंभीर जखमी*

*नागपुर उपजिल्हा -प्रतिनिधी दिलीप येवले*

स्थानिक विज केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागांतर्गत असलेल्या वॅगन टिपलर परिसरात 14 डिसेंबर शनिवारला दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडत असतांना कोळशाची रिकामी वॅगन आयशर मालवाहक मिनी ट्रकवर जाऊन आढळल्याने मालगागाडीचा वॅगन खाली दबून सदर ट्रक चकनाचुर झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार श्रीकांत महादेव पांडे – 60 रा. वार्ड नं. 3 रेल्वे चौकी खापरखेडा असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. खापरखेडा औष्णिक विज केंद्रात ईतर राज्यातून रेल्वेच्या मालगाडीने कोळसा आणल्या जातो यासाठी विज केंद्र प्रशासनाने सात रेल्वे ट्रॅक तयार केले आहे सदर कोळसा वॅगन टिपलर परिसरात खाली करण्यात येतो घटनेच्या दिवशी 14 डिसेंबर शनिवारला दुपारी 1.30 च्या सुमारास ट्रक चालक श्रीकांत पांडे हा आयशर मिनी ट्रक क्रमांक MP-28-G-4148 ट्रक मध्ये लोखंडी सळाख भरून 500 मेगावॅट वीज केंद्रात खाली करण्या साठी जात होता मात्र यादरम्यान विज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागाच्या वॅगन टिपलर परिसरात मालगाडीतील कोळशाचे वॅगन खाली करण्यात येत होते सदर वॅगन 25-30 मीटर अंतरावर असल्यामुळे आपण सहज रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ शकतो असा समज ट्रक चालक पांडे यांचा झाला रस्ता ओलांडत असतांना खाली झालेल्या दोन वॅगनला रुळावर लावण्यासाठी रेल्वे इंजिन दूर करताच काही कळण्याच्या आत ट्रकवर जाऊन वॅगन आढळली जवळपास 25 फूट अंतरावर सदर ट्रकला फरफटत नेले वॅगन थांबल्यावर ट्रकच्या काचा फोडून पांडे बाहेर आले दुदैवाने ते थोडक्यात बचावले सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले जखमी पांडे यांना रुग्णवाहिकेत विज केंद्राच्या रुग्णालयात आणण्यात आले ते गंभीर जखमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …