*मेटाडोरच्या धडकेत तरुण विद्यार्थिनी मृत्यू*
*मैत्रिण गंभीर जखमी*
*नांदा फाटा हॉटेल नैवेदम समोरील घटना*
*वलनी परिसरात शोककळा*
उपजिल्हा प्रतिनिधि- दिलीप येवले
कोराडी– वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या दोन तरुण मैत्रिणी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी जात असतांना मागून येणाऱ्या मेटाडोर चालकाने जोरदार धडक दिल्याने एका मैत्रिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुसरी मैत्रिण गंभीर जखमी आहे सदर घटना नांदा फाटा हॉटेल नैवेदम समोर 16 डिसेंबर सोमवारला दुपारच्या सुमारास स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मृत तरुणीच्या वलनी गावात संपूर्ण शोककळा पसरली आहे. प्राप्त माहिती नुसार मृतक महाविद्यालयीन तरुणीचे नाव ज्ञानेश्वरी नरेश सोमनाथे (वय 22 – रा वलनी) असे असून जख्मी विद्यार्थिनीचे नाव कोमल रामकृष्ण बावनकुळे (वय 21- रा. पिपळा) (डाकबंगला) असे आहे मृतक ज्ञानेश्वरी व कोमल ह्या बबनराव तायवाडे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला आहे 16 डिसेंबर सोमवारला पेपर असल्याने त्या दुपारी 12.30 च्या सुमारास स्कुटी क्रमांक एमएच-40-बीए-6940 परीक्षेला जात होत्या मात्र नियतीला काही वेगळेच होते नांदा फाटा हॉटेल नैवेदम समोर असलेल्या महामार्गावरून जात असतांना मागून येणाऱ्या एमएच-40-एआर-7331 मेटाडोर चालकाने जोरदार धडक दिली सदर घटनेत ज्ञानेश्वरीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कोमल गंभीर जखमी झाली कोमलवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीसांना सदर घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून घटनेतील मेटाडोर ताब्यात घेतला असून चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे सदर मेटाडोर जिवतोडे ब्रदर्स यांच्या मालकीचा असून तो नागपूरला भाजीपाला घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे मृतक ज्ञानेश्वरीचे वडील शेती व्यवसाय करीत असून तिला एक बहिण व एक भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे सायंकाळी ज्ञानेश्वरीवर शोकाकुल वातावरणात वलनी वस्ती गावात अंतिम संस्कार करण्यात आले.