*सटवा माता मंदिर परिसरातील लाँज त्वरीत बंद करा*
*परिसरातील महिलांचे जिल्हाधिकारी यांना साकडे़*
*विद्यार्थीनी व महिलांना वाढतोय मनस्ताप*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः शहरातील वार्ड क्र.5 बस स्थानक परिसरातील सटवा माता मंदिर परिसरात सुरु असलेले लाँज तात्काळ बंद करा असे निवेदन वार्ड क्र. 5 परिसरातील महिलांनी मा.रवीन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना केले आहे*
*बस स्थानक परिसरात असलेल्या पुरातन सटवा मातेचे भव्य मंदिर असुन सावनेर शहरासोबतच तालुक्यातील भाविकांच्या आस्थेचे स्थान आहे सोबतच सदर परिसरात दवाखाने,शिकवणी वर्ग,ब्यूटी पार्लर,कार्यालये तसेच परिसरातील वार्डात राहणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ असते.सजर परिसरात मुख्य रस्त्यावर असलेल्या लाँज मधे येणार्या महिला पुरुषांचे आपत्तीजनक हरकती,अश्लील चाळे ही नित्याची बाब झाली असुन पाहटे पासुन तर उशिरा रात्री पर्यंत सुरु असलेल्या प्रकारामुळे परिसरातून ये जा करणार्या विशेषतः विद्यार्थी विद्यार्थींनी,महिला व भावीक मंडळी यांना सततचा त्रास सहन करावा लागत आहे.व सदरहू प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिसरातील धार्मिक पावित्र पणाला लागून भाविकांच्या भावना दुखावत आहे.सोबतच सदर परिसरातवास्तव्य करणार्या कुटुंबीयांना कमालीचा मनस्ताप तर सहन करावा लागत आहे तसेच आपल्या पाल्यांचे भवितव्य धोक्यात दिसू लागले आहे*
*सदर विषयाचे निवेदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.रवीन्द्र ठाकरे हे सावनेर तहसील कार्यालयाच्या दौर्यावर आले असता सदर परिसरातील मंजू गवली,सुमन पाचभावे,मीरा पटेल,गीता चंदनकर,मंदा आसोलकर,मीरा कोल्हे,सुशिला ढोके,क्रांती पटेल पोर्णीमा कोल्हे इत्यादी सह अनेक महिलांच्या शिष्टमंडळा सोबत नगर सेवक अविनाश झाडे,सौरभ घटे इत्यादी नी भेट घेऊण वरील परिस्थितीची सविस्तर माहीती मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या समक्ष मांडून सुरु असलेले लाँज त्वरीत बंद करुण परिसरातील पावित्र जपण्याकरीता तातडीने उपाययोजना आखण्याची मागणी सदर निवेदनातून केली आहे*
*याप्रसंगी सावनेर तहसीलदार दिपक कारंडे प्रमुख्याने उपस्थित होते. परिसरातील भाविक मंडळी व संतप्त महिलांच्या निवेदनावर मा.जिल्हाधिकारी साहेब कोणते पाऊल उचलतात याकडे परिसरातील नागरिकांन सोबतच सटवा माता भाविक मंडळी व नगर वासीयांचे लक्ष वेघले आहे*