*जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त*

*जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त*

सावनेर विशेष प्रतिनिधि

सावनेरअवैधरीत्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून पोलीस ठाणे केळवद येथील पोलिसांनी महामार्ग क्रमांक 47 बिहाडा फाट्यावर नाकाबंदी केली असता भरधाव वेगाने एक ट्रक येताना दिसला यात 40 जनावरे पाय व तोंड दोरीने बांधून दिसली. दरम्यान पोलिसांनी कारवाई करून ट्रक सह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त केला*
*पोलीस स्टेशन केळवद यांना मिळालेल्या माहितीनुसार पांढुर्णा ते नागपूर जाणाऱ्या हायवे रोड 10 चक्का ट्रक क्रमांक एम एच 17 एच एच 18 0 3 मध्ये अवैधपणे कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात होती पोलिसांनी पांढुर्णा रोड महामार्ग क्रमांक 47 वरील बिहाडा फाट्यावर नाकाबंदी केली असता जनावरांनी भरलेला ट्रक भरधाव वेगाने येतांना दिसला त्याला थांबविण्याचा इशारा दिला असता त्यातील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन न थांबविता नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने पळविला पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालकांनी आळाफाटा पांढुर्णा महामार्गावर सदर ट्रक सोडून जंगलाचा फायदा घेत पळाला दरम्यान पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता यात 19 गाई व 21 वासरे असा एकूण 40 जनावरे किंमत 6 लाख रुपये निर्दयतेने पाय व तोंड दोरीने बांधून दिसले तसेच ट्रकच्या खालच्या मागील भागात दोन सागवान लाकूड व एक हजार रुपये असा एकूण वाहनांसह 16 लाख शंभर रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला*
*पोलीस स्टेशन केळवद अप क्रमांक 271 /2019कलम11(1)(घ)(ड)(च) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक आधीनियम सह कलम 5 अ 9 महा संरक्षण अधिनियम 1965 कलम 179 /184 मोवा का 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस नायक राजेंद्र रेवतकर हे करीत आहेत*
*सदर कारवाई पोलीस अधीक्षक नागपुर राकेश ओला; अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्रीमती मोनिका राऊत उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरबळकर सावनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेश मटामी,सपोनि पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड,राजेंद्र रेवतकर,सचिन येळकर,गुणेश्वर डाखोळे यांनी केली.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …