*१२ सभापतिपदांपैकी ८ पदे एसटी, ३ ओबीसी तर १ एससीसाठी राखीव*
गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर
गडचिरोली- : आज झालेल्या पंचायत समिती सभापतिपदांच्या आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी ८ पंचायत समित्यांची सभापतिपदे अनुसूचित जमातीसाठी, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३ आणि अनुसूचित जातीसाठी १ सभापतिपद राखीव झाले आहे. अनुसूचित जमातीच्या ८ पदांपैकी ३ पदे, तर नामाप्रच्या ३ पदांपैकी २ पदे महिलांसाठी राखीव झाली आहेत.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी(निवडणूक) कल्पना नीळ-ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित सभेत जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांचे आरक्षण चक्रानुक्रम व सोडत पद्धतीने काढण्यात आले. नवे आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
गडचिरोली-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), आरमोरी-नामाप्र (महिला), देसाईगंज-नामाप्र (महिला), चामोर्शी-अनुसूचित जाती (सर्वसाधारण), मुलचेरा- नामाप्र (सर्वसाधारण), कोरची-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), भामरागड-अनुसूचित जमाती (महिला), सिरोंचा-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), एटापल्ली-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), अहेरी-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), धानोरा-अनुसूचित जमाती (महिला) व कुरखेडा-अनुसूचित जमाती (महिला).