*बंद पडलेले कँसीनो सेंटर इतरत्र हलविण्याच्या बेतात*
*तक्रारकर्ते व पोलिसांच्या सक्रियतेचे फलीत*
*नेते मंडळी पुढे लोटांगण घालुन ही संचालकांच्या पदरी निराशाच*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः शहरात सुरु असलेल्या अवैध कँसीनो सेंटर च्या विरोधात सततच्या प्रकाशित होत असलेल्या बातम्या व तक्रारी वरुण सावनेर पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीसांनी धड़क मोहीम राबविल्याने आता सावनेर शहरात आपले बिन परवाना अवैध कँसीनो सेंटर सुरु होणार नाही याची चाहूल कँसीनो सेंटर चालकांना लागल्यामुळे आता हा अवैध व्यवसाय सावनेर शहरात थाटता येणार नसल्याचे दीसून येत असल्यानेसदर अवैध कँसीनो सेंटर इतरत्र हलवीण्याच्या बेतात असल्याचे सुत्र आहे*
*बिन परवाना व अवैध रुपाने कँसीनो मशीनी मधे तांत्रिक बिगाड़ करुण फसवणूक करत असलेल्या या कँसीनो सेंटर च्या विरोधात महाराष्ट्र न्यूज मीडिया ने बातम्या प्रखरतेने प्रकाशित करत सदर अवैध व्यवसायामुळे शहरातील गोर गरीब परिवार उघड्यावर पडत असुन विद्यार्थी व युवा वर्गचे अवैध मनोरंजनात्मक खेळाच्या आड़ आपल्या जिवनचे व भविष्याचे वाटोळे होत असल्याचे निदर्शनास आणून देताच पोलीस प्रशासन हरकतीत आले व शहरात सुरू असलेल्या अवैध कँसीनो सेंटरच्या विरोधात नीयोजनबध्द कारवाया सुरु केल्याने हा अवैध कँसीनी व्यवसाय शहरात कायमचे बंद पडले*
*नेते मंडळाचे उंबरठे झिजवून ही उपाय शुन्य*
*शहरात अवैध रुपाने सुरू असलेल्या प्रत्येक कँसोनो सेंटरवर दररोज लाखोची उलाढाल व त्यातून “सारा माल डब्बेमे” असा हा मनोरंजनाच्या आड़ चालणारा अवैध कँसीनो व्यवसाय शहरात झपाट्याने वाढत होता याचा कायमचा पायबंद व्हावा करिता महाराष्ट्र न्यूज मीडिया ने पुढाकार घेतला व बघता बघता सदर विषयाला अनुसरुन पीडित ही पुढे येऊण तक्रारी नोंदवू लागले तर युवक काँग्रेस तर्फे ही सदर अवैध कँसीनो सेंटर च्या विरोधात खंबीर पणे पुढे येत पोलीस निरिक्षक सावनेर व वरिष्ठांना निवेदन सादर करुण सदर व्यवसाय कायमचा बंद करुण आपल्या सामाजिक कार्याची जान करुण दीली.शहरात सदर अवैध कँसीनो सेंटर बंद पडल्याने संचालकांचे दररोज जरी लाखोचे नुकसान होत असले तरी संपुर्ण शहरात व पीडित परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण असुन सदर अवैध व्यवसाय परत शहरात थाटल्या गेल्यास अनेक पीडीतांनी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे.*
*अश्यात आपला हा लुटमारीचा व्यवसाय कायमचा बंद होणार असल्याचे चित्र या अवैध कँसीनो सेंटर संचालकांच्या नजरेपुढे येऊ लागले व सदर व्यवसाय क्षेत्रातील नेते मंडळीच्या आशीर्वादाने परत सुरु करण्याचे प्रयत्न संचालकाकडून सुरु झाले.अश्यात काही नेते मंडळी सुध्दा नगरीचे वाटोळे होते तर होउ द्या परंतू सदर अवैध व्यवसाय परत सुरु झाला पाहीजे करिता सरसरावले असून तक्रारकर्त्यांच्या मानधरणीला लागले परंतु तक्रारकर्ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याने त्यांना यश आले नाही. छोटभैय्यै नेत्याकडून आपले काम बननार नाही असे चीत्र असतांनाच सदर संचालकांनी क्षेत्रातील बडे़ नेत्यांचे उंबरठे झिजवीन्यास सुरुवात केली परंतू तेथून त्यांना चक्क हाकलून लावल्याचे खात्रीलायक वु्त्त आहे.सर्व स्तरावरूण प्रयत्न करुण ही आता आपण सावनेर शहरात आपला हा अवैध लुटमारीचा कँसीनो व्यवसाय थाटू शकत नाही हे लक्षात येताच आता हा अवैध व्यवसाय इतरत्र हलविण्याच्या तयारीला वेग आला आहे
*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात कुठेही हा अवैध व्यवसाय थाटू देणार नाही*-(राजेश खंगारे)
*सावनेर शहरात सुरु असलेला हा अवैध कँसीनो सेंटर चा व्यवसाय कायमचा बंद व्हावा या करिता सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी व माझे संपूर्ण पदाधिकारी सतत प्रयत्नशील राहु व या अवैध कँसीनो संचालकांचे फसवे प्रयत्न हाणून पाडू असे ठाम मत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खांगारे यांनी व्यक्त केले असुन कुठेही असे अवैध बिन परवाना कँसीनो सेंटर दिसल्यास त्याची माहिती नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना द्यावी असे आव्हान केले असुन तक्रारकर्ते व पीडीतांना या अवैध व्यवसाईकांन कडून घाबरण्याचे कारण नाही संपूर्ण युवक कँग्रेस आपल्या पाठीशी आहे असे विश्वास स व्यक्त केला*