*सावनेर येथील जुने धान्य गंज येथे असलेली चिकन मच्छी मार्केट हटवा*

*जुने धान्य गंज येथे असलेली चिकन मच्छी मार्केट हटवा*


*सतत घाण व दुर्गंधीच्या वातावरणात जीवन जगण्यास मजबूर*

*नगरीकांचे मुख्याधिकारी व वरिष्ठांना नीवेदन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः शहराच्या मध्यभागी भर वस्तीत असलेल्या जुना धान्यगंज परिसरातील धान्य गंज कु्षी उत्पन्न बाजार समीती येथे स्थलांतरीत झाल्याने सदर खाली जागेवर मटन मार्केट सुरु झाले व बघता बघता चिकन व मासोळी ची दुकाने लागु लागली जवळच असलेल्या दुर्गा मातेचे मंदिर असल्याने भाविकांच्या भावना जपण्याचे कार्य तत्कालीन नगर प्रशासनाने करत कळमेश्वर रोड वर सर्व सुविधा युक्त मटन मार्केट चे निर्माण करुण तेथे मटन व चिकन व्यवसायीकांना हलवीण्याचे प्रयत्न केले परंतू चिकन व्यवसायीकांनी मज्जाव करत नव निर्मिती मटन मार्केट हे चिकन व्यवसायीकांचे सोईची नसल्याचे व आम्ही रस्त्यावर बसत नसून बंद कमर्यात आपले व्यवसाय करतो असे म्हणत चिकन व मासोळी व्यवसायाकरिता सर्व सुविधा युक्त वेगळे चिकन मासोळी मार्केट बनवून देण्याची अट घालत मटन मार्केट मधे जाण्याचे टाळले.परंतू स्थानिक मटन व्यवसाईकांनी नगर प्रशासनाच्या व नागरिकांच्या भावनांचा सन्मान करीत आपले व्यवसाय मटन मार्केट मधे हलवून प्रतिसाद दीला*


*परंतु जुना धान्य गंज येथील काही खाजगी घरातील दुकानाच्या गाळ्यात थाटला असलेल्या चिकन व्यवसायी व ओट्यावर बसून मासोळी व्यवसाय करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढु लागली सोबतच सदर परिसरात शासकीय देशी दारु चे चिल्लर विक्रीचे दुकान असल्याने त्या परिसरात पान टपर्या,अंडी,आमलेट सह इतर टपर्यां असुन दिवसभर तर चिकन चा वास व रात्रीला चिकन मासोळी च्या टाकाऊ मासांचे लोथडे व त्यावर ताव मारणारे मोकाट कुत्र्यांचा हौदस व त्यातून उठणारी दुर्गधीचा त्रास नगर प्रशासनास अनेक निवदने करुण ही आजही परिसरातील नागरिकांना होत आहे*


*सावनेर येथील वार्ड क्रमांक 11 जुने धान्य गंज येथे असलेल्या देवीचे मंदिरासमोर असलेल्या अनधिकृतपणे ओट्यावर चिकन व मच्छी ची ठोक व चिल्लर विक्रीची दुकाने आहेत याच परिसरात आधी मटन मार्केट होते माता दुर्गा ची मूर्ती चा स्थापनेमुळे हे मटण मार्केट अन्यत्र हटविण्यात आले परंतु चिकन व मच्छी बाजार येथे सुरू आहे त्यामुळे परिसरातील रहिवासी दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा भावनेला ठेच पोहोचत असून व मास विक्रेत्यांच्या केलेल्या घाणीमुळे व साफसफाईच्या अभावामुळे नागरिकांना गंभीर आजाराशी सामना करावा लागत आहे या वॉर्डातील नागरिकांनी अनेकदा याकरिता तक्रारी व आंदोलने केली आहेत हे विशेष…*


*नगर प्रशासनाने नव्याने बाधलेल्या चिकन मार्केट मधे हलवा*
-(कमल भारव्दाज सेवा निवु्त्त प्राचार्य)

*सेवा निवु्त्त प्राचार्य कमल भारद्वाज यांनी मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर,मा.उपविभागीय अधिकारी सावनेर,मा.संचालक नगर रचना विभाग नागपूर, मा.एकनाथ शिंदे मंत्री नगर रचना विभाग महा.शासन मुबई,मा.सुनील केदार आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र यांना लेखी निवेदन सादर करुण नगरपरिषदेने चिकन व मच्छी विक्रेत्यांना नवीन मार्केट बांधून दिली आहे तरीपण चिकन व मच्छी विक्रेत्यांना बांधलेल्या मार्केटमध्ये हलविण्याकरिता नगर प्रशासन कोणतेही हालचाली करीत नसून मुद्दामून लोकांच्या भावनेतून खेळत आहे ह्याच परिसरात चिल्लर देशी दारूचे दुकान असल्यामुळे व लहान लहान स्टॉल वटफळी चे दुकान यामुळे मधपी व असामाजिक तत्त्वांचा हौदोस वाढत आहे त्यामुळे महिला व शाळा-महाविद्यालयात मध्ये जाणाऱ्या मुलींना त्रास सहन करावा लागत आहे नियमित साफसफाई होत नाही सफाई झाली तर कचरा उचलला जात नाही तसेच कचरा पेटी ची व्यवस्था नाही इत्यादी मागणीचे निवेद सादर करुण सदर विषयावर तात्काळ उपाययोजना करुण चिकन व मासोळी व्यवसायीकांना नव्याने तयार केलेल्या गाळ्यात स्थानांतरीत करण्याची मागणी निवेदनातून केली आहे*
*वरील अनेक प्रश्‍नांच्या संदर्भात येथील नागरिकांनी बरेच वेळा लेखी तक्रारी सुद्धा केली आहेत तरी पण प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नाही आहे शेवटी नाईलाजाने येथील रहिवासी व त्रस्त नागरिकांना आंदोलनात्मक पाऊल उचलण्यास बाध्य व्हावे लागेल करिता प्रशासनाने वेळ राहता सदर व्यवसाईकांना नव्याने बांधलेल्या गाळ्यात हलवीण्याच्या प्रक्रियेत वेग आणावा अशी विनंती केली आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …