*आस्थेच्या नावावर जनावरे चोरीचा नवा पायंडा उघडकीस*
*पशुधन चोरी करण्या करिता देवी-देवत्यांचा वापर*
*चोरी केलेल्या पशुधनाची कत्तलखान्यात थेट रवानगी*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः ग्रामिण भागामधे टाटा कंपनीच्या छोट्या हाथी सारख्या वहानांना देवाच्या रथा सारखा आकार देऊण त्यावर शंकरजी,दुर्गा देवी,साई बाबा,नंदी बैल आदीचे चित्र लावून सदर वाहनातून चार सहा महिला परुष मंडळी या ना त्या नावने देणगी मागत असल्याचे दु्ष्य नेहमीचिच व सामान्य बाब आहे यात काही वाहनात गाईला अथवा बैलाला पाच सहा पाय असल्याचे बतावनी करुण सदर प्राण्यांचे दर्शन केल्यास पुण्य लाभ होण्याचे दिव्य स्वप्ने दाखवून भोळ्या भाभळ्या भाविकांची दिशाभुल करणारे चोरटे ही असु शकतात यांचे प्रत्यक्ष उदाहरण सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील काटोल रोड वरिल महाकली नगरी नजीक बघावयास मीळाले*
*दि.23 डिसेंबर रोजी दुपारी 1-00 च्या दरम्यान MH BL 2754 क्रमांकाची टाटा एस ला रथाचे स्वरूप देऊण शंकरजी,दुर्गा माता,साईबाबा,नंदेश्वर महाराज आदींच्या चलचित्राने रंगविलेल्या या चार चाकी वाहणात संशयापद स्थितीत एक लाल कलर च्या वासर्याला तीन चार युवक ओढुन टाकत असल्याचे निदर्शनास येताच काही नागरिकांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात लाल रंगाचे वासरु हे चंदन रोहिदास पठाणे या शेतकऱ्यांचे असल्याचे निदर्शनास येताच आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सावनेर पोलिसांना सदर घटनेची सुचना देऊन वाहनात असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेऊण तपासणी सुरु केली असता तीन्ही आरोपींनी सदर वासरास चोरी करून कत्तल खान्यात विकण्याचा बेत असल्याची कबुली दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगतले*
*सावनेर शहरा सह ग्रामीण भागातून गाई,म्हशी,बैल,बकर्या सारख्या पशुधनाची चोरी ही नित्याची बाब झाली असुन दर दोन चार दिवसात अश्या घटना घडतात परंतू पशुधन चोरी करीता देव-देवत्यांच्या पालकीचे स्वरूप वाहनास देत भाविकांच्या आस्थेचा खेळ मांडून पशुधन चोरीची घटना उघडकीस आल्याने भाविकांच्या आस्थेला धक्का पोहचत आहे*
*सावनेर पो.स्टे.येथे अ.क्र.895/19 कलम 379 – 34 नुसार गुन्ह्याची नोंद करुण आरोपी चंदू विनायक घोरमारे वय 27,रुपलाल यशवंत सुरपाते वय 37 व 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी सर्व राहनार कोकर्डा पो.किनखेडे पीपळा ता.कळमेश्वर असे तीन आरोपींन सह 25 हजार रुपये किंमतीचे वासरू,5 लक्ष 30 हजार रुपायाचे टाटा एस मीनीडोर वाहन असे एकूण 5 लक्ष 55 हजार रुपयाचा ऐवज जप्त करुण पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.जुनूनकर पो.का.गौतम मेश्राम व गणेश उईके पुढील तपास करीत आहे*