नारायणपूर येथे पारंपरिक सर्वधर्मीय ग्रामसभेची स्थापना*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना आपल्या राज्यघटनेच्या कलम 244(1) नुसार तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1957 प्रकरण 3 (अ) 54(अ) नुसार ग्रामसभा हक्क अधिकार व सवलती शैक्षणिक, सुशिक्षित, शेती, सांस्कृतिक हक्कासाठी OBC, SC, ST व इतर समाजासाठी गाव पातळीवर ग्रामसभा कार्यकारणी तयार करणे, व सभासद नोंदणी चे कार्य आतापर्यंत 60 हुन अधिक गावामध्ये झाले आहे, या ग्रामसभेचे कामाचे उद्दिष्टे वनहक्क धारकांना त्यांचे हक्क मिळवून देणे, शेतकऱ्यांना कृषीविषयी योजना व हक्क मिळवून देणे, पंचायत समिती व तहसील कार्यालयातील शासकीय कार्य करवून घेणे, महिलांना हक्क व अधिकार मिळवून देणे, सर्व धर्मीय कार्यक्रम व सभा घेणे व शासकीय योजना जनजागृती करणे व सांस्कृतिक कला व क्रीडा करणे, सुशिक्षित बेरोजगाराच्या मागण्या साठी शासकीय दरबारी मोर्चे, मेळावे, प्रदर्शन, उपोषने करणे, गोंडी भाषा व लिपी ला आठव्या सुचिमध्ये समाविष्ट करणे, बंगाली बांधवांच्या हक्काचे कार्य करणे, महिला बचतगटला शासकीय योजनेची जनजागृती व माहिती पुरविणे, SC, ST, OBC व इतर समाजाच्या हक्क व न्यायासाठी कार्य करणे व या संघटनेत ग्रामसभा मध्ये त्यांना सदस्य बनविने, इत्यादि महत्व पूर्ण निर्णय घेवून कामकाज करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. एस.बी.कोड़ापे होते व त्यानि जनतेला संबोधित करताना आदिवासी बांधवाना निसर्गप्रेम करनारी जमात म्हणून आदिवासी सामाजाचे उल्लेख केले.
कार्यक्रमाची सुरवात पारंपरिक पद्धतीने *गोंगो पुजा* करून करण्यात आली. आदिवासी बांधवांच्या धार्मिक सामाजिक रीति रिवाज कसे नीसर्गाशी जुडलेले आहेत व संपूर्ण समाज कसा नैसर्गिक तत्वांशी जुडलेला आहे व दोघेही एकमेकांवर अवलंबुन आहेत हे जनतेला पटवुन दिले.
मंचावर पारंपरिक तालुका ग्रामसभा जिल्हा गढ़चिरौली चे अध्यक्ष डॉ. एस बी कोड़पे,सचिव प्रवीण सेडमाके, उपाध्यक्ष सुधाकर पोटावी, महामंत्री बंडूजी मडावी, सहसचिव निखिल सेडमाके, पांडुरंग कोड़ापे(भुमक), प्रभाकर येरमे (भूमक), रामदास जी नेताम (भूमक) हे उपस्थित होते व यानी मार्गदर्शन केले.
मंचावर समाज संघटिका कौशल्या टेकाम ह्या उपस्थित होते. मंत्री रामा टेकाम, मंगला बाई टेकाम,कालिदास टेकाम, उमेश झुरे, सुनील टेकाम, कपिल टेकाम, किशोर कोड़ापे, राकेश कोडापे, देवाजी टेकाम, भाउजी टेकाम, मोरेश्वर टेकाम, रंजीत टेकाम व गावकरी उपस्तिथ होते.
आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करताना सलोनी गेडाम, स्वप्निल गेडाम, पूनम नेताम, भैरव नेताम, अंकित मडावी , मुनिता टेकाम यांच्या समुहाने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी विकास जुमनाके, सोनू कुंभरे, जानकीराम मडावी, अंकुश
सेड़माके कैलास कोवे यानी प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमास हज़ारों आदिवासी- मूलनिवासी बांधव व समाज सेवक श्री. मनोज उराडे, महाराष्ट्र न्युज मीडिया जिल्हा प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता श्री सुरज कुकुडकर सर उपस्थित होते