पोलीस विभागातर्फे मुलींसाठी “सव्यंसंरक्षण” शिबीर आयोजित.
(गडचांदूर येथे आयोजन/मुलींनी घेतला लाभ)
आवारपूर प्रतिनिधि-गौतम धोटे
काही नराधमांमुळे सध्या देशाचे वातावरण अनपेक्षितपणे गढूळ झाल्याचे पहायला मिळत आहे.कित्येक ठिकाणी माता भगिनी कमालीच्या दहशतीत वावरत असल्याचे चित्र असून काही मानवरुपी राक्षस प्राण्यांणाही लाजवेल असे कृत्य करत असल्याचे चित्र आहे.देशात घडणाऱ्या घटनांची गंभीरता लक्षात घेता चंद्रपूर पोलिसांतर्फे २३ डिसेंबर रोजी गडचांदूर येथे शालेय मुलींसाठी “सव्यंसंरक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात कोरपना, जिवती,पाटन,टेकामांडवा,भारी,गडचांदुर या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्यासंख्यने सहभाग घेऊन स्वयंस्वरक्षणाचे धडे गिरवले.स्वयंसंरक्षाणाची माहिती प्रत्येक मुलींना असने काळाची गरज असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.सदर शिबीर एसडीपीओ यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली तर एपीआय एकुडके मॅडम,प्रविण रामटेकेसह इतर सहयोगी कर्मचारी प्रशिक्षण दिले. यावेळी गडचांदूर ठाणेदार गोपाल भारती,महिला,पूरूष पोलीस कर्मचारी,सर्व शाळेतील शिक्षकांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.मोठ्या आवडी व उत्साहाने मुलींनी सदर शिबीराचा लाभ घेतला.सध्याची परिस्थिती पाहता अशे शिबीरांची अत्यंत गरज असल्याचे भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.