*सावनेर पोलिसांच्या उपक्रम आँपरेशन मुस्कान 07*
*कामाच्या शोधात बस स्थानकावर होता निराश्रीत देवेश*
सावनेर प्रतिनिधी -सुरज सेलकर
*सावनेरः देवेश अशोक मोडके इयत्ता 8 वी वय 14 रा.मेडिकल चौक नजीकच्या रामबाग झोपडपट्टी नागपूर येथील रहवासी असुन मागील दोन दिवसापासून तो सावनेर बस स्थानक परिसरात राहत होता*
*सावनेर पो.स्टे.चे.पी.एस.आय.निशांत जुनोनकर यांच्या निदर्शनाह सदर मुलगा येताच त्यांनी त्याला विचारपुस केली असता त्यांनी त्याला आई वडील नसून तो निराश्रित असल्याचे सांगत कामाच्या शोधात इकडे आल्याची माहीती दीली असता देवेश यास पोलीस प्रशासनाव्दारे राबविण्यात येत असलेल्या आँपरेशन मुस्कान 07 या मोहीमे नुसार त्यास सुरक्षित स्थानावर हलवीण्याकरिता त्यास सावनेर पो.स्टे.ला आणून पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाईन ला सुचना देण्यात आल्या असुन सदर मुलाचे भविष्य उज्वल व्हावे व त्यास संपूर्ण मदत मिळावी करिता त्यास चाईल्ड सेंटर येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पीएसआय निशांत जुनोनकर यांनी दिली सदर आँपरेशन मुस्कान 07 या मोहीमे मुळे घरुण निघालेल्या मुलांना अथवा हरविलेल्यांना त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवण्याच्या दु्ष्टीने पोलीस प्रशासनाने सुरु केलेल्या या मोहीमेस यशस्वी करण्या करिता म.पो.ना.मनीषा बंडीवार हीने सहकार्य केले*