भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा १३४ वा स्थापणा दिवस साजरा केला
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा १३४ वा स्थापणा दिवस आणि काँग्रेस सेवादलाचा दलदिवस दिवस
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवादलाचे वतीने तारसा ता. मौदा जि. नागपूर येथे अत्यंत उत्तसाहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री तुळशीराम काळमेघ, होते तर ध्वजारोहण समारंभ तारसा येथील जेष्ट नागरिक श्री डांगरेजी ह्यांचे हस्थे सेवादलाचे शिस्तीत पार पडला. कार्यक्रमात काँग्रेसचा ईतीहास आणि आजच्या परिस्थितीवर तसेच सेवादलाचे दल दिवसा संबंधित माहिती देण्यात आली. ह्यावेळी प्रेमसिगजी बैस, राजेंद्रजी लांडे, ज्ञानेस्वरजी वानखेडे, श्री तुळशीराम काळमेघ आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाला श्री राजकुमारजी गेडाम सचीव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, तसेच जिल्हा पदाधिकारी श्री चन्योडे अॅड. वाडीभस्मे, अॅड.श्रीरामे, यंग ब्रिगेड चे अध्यक्ष श्री सचिन चीकटे, जिल्हा महिला सेवादल अध्यक्षा सौ. कविता कळंबे, श्री शेखर टाले, विनायक काटकर, बाळकृष्ण खंडाईत, भुमेस्वरजी गभणे, सुनिल डोंगरे, मोतीरामजी देशमुख आणि शेकडो काँग्रेस सेवादलाचे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार गेडाम यांनी केले तर आभार सौ. कविता कळंबे ह्यांनी मानले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला.