*मी…सुनील छत्रपाल केदार म्हणताच कार्यकर्त्यात संचारला उत्साह*
*ढोल ताशे व फटाक्याची आतीषबाजी*
*मुख्य मार्गाने रैली काढून नागरिकांना वाटले पेढे*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणारच असे अपेक्षित असतांना लांबनीवर गेलेला मंत्रीमंडळ विस्तार केव्हा पार पडतो व आपल्या लाडक्या आमदारास परत मंत्री पद केव्हा मिळतो याची उत्कंठा शिगेला पोहचून प्रत्येक कार्यकर्ता या क्षणाची तिव्र प्रतीक्षा होती*
*आश्यात आज दि.30 डिसेंबर रोजी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या एकूण 36 मंत्र्यांचा शपतविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात दुपारी 12 च्या दरम्यान पार पडला यात सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठिच्या वतीने वर्णी लागल्याने शपतविधी सोहळ्यात “मी सुनील छत्रपाल केदार”असे म्हणत शपतविधीला सुरुवात करताच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात एकच जल्लोश निर्माण होऊण ढोल ताश्यांचा गजर , फटाक्यांची आतीषबाजी व एकमेकांना शुभेच्छा देत बेभान झालेल्या कार्यकर्त्यानी उत्साहात सारा करु लागले तर काही ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली*
*सावनेर क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या करिता शिवसेनाआघाडीचे सरकार परत एकदा लाभी ठरले आहे.यापुर्वी 1994 मधे ही आमदार सुनील केदार यांना तत्कालीन शिवसेना भाजप युतीच्या शासनात उर्जा व राज्य परिवहन मंत्री पद प्राप्त झाले होते. तब्बल 30 वर्षानंतर परत एकदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाल्याने आमदार सुनील केदार यांना मंत्रीपद मिळणार अश्या अपेक्षा वाढल्या होत्या.आज परत आमदार सुनील केदार यांना मंत्री मंडळात कँबीनेट स्तराचे मंत्रीपद प्राप्त झाल्याने काँग्रेस पक्षा सोबतच कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊण आमदार सुनील केदार यांच्या पदरी तब्बल 30 वर्षाचा दांडग्या अनुभवाचा नक्कीच लाभ मीळून नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष मजबूत होऊण अनेक रडखडलेल्या जनसमस्या मार्गी लागणार असल्याचा आशा पुलकीत होऊ लागल्या आहे*
*नगर परिषद सावनेर चे नगर सेवक व गटनेते सुनील चाफेकर यांच्या नेतृत्वात गांधी चौक व नगर परिषद कार्यालयाच्या पटांगाणात नगरसेवक नीलेश पटे,दिपक बसवार,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,वरिष्ठ काँग्रेसी नेते डोमासाव सावजी,चंदु कामदार,सचिन मोहतकार,इमरान शाह प्रफुल सुपारे,राहुल घोंगडे,मोहीत बारस्कर,आकाश कमाले,मनीष रुषीया,राहुल घोडसे,सुरज आवळे,सुदर्शन वाघमारे,विलास मानकर,स्वप्नील महाजन,प्रवीण सेवके सह शेकडो कार्यकत्यांनी नगरीतील मुख्य मार्गाने ढोल ताश्यांच्या गजरात मुख्य चौकात फटाके फोडून आपला उत्साह साजरा केला*