*तीन मजली इमारत कोसळली*
*निर्मल स्वीट मार्ट भुयीसपाट तर राधास्वामी हार्डवेअर केव्हाही पडण्याची शक्यता*
*आकोल्यातील गांधी रोड वरिल निर्मल स्वीट मार्ट ची जुनी इमारत रात्री दहाच्या दरम्यान अचानक कोसळली मात्र जिवीत हाणी नानी नसल्याने सुटकेचा श्वास*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
*आकोला – येथील गांधी रोडवरिव जुना कपडा बाजार मधे असलेल्या निर्मल स्वीट मार्ट ची तीन मजली इमारत बुधवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान अचानक कोसळली सदर दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी निर्मल स्वीट मार्ट संचालकाचे अंदाजे एक कोटीचे नुकसान झाले आहे*
*जुने कपडा बाजारात निर्मल स्विट मार्ट ही जवळपास पन्नास वर्ष जुनी इमारत असुन सदर इमारतीच्या शेजारी शु माँल असुन सदर शु माँल मालकाने काही दीवसापुर्वी बुलडोझरने काही खोदकाम सुरु केले सदर खोदकामा मुळे आपल्या इमारतीला हादरे बसत असल्याने स्वीट मार्ट संचालक धर्मेन्द्र प्रभुदास खिलोसीया (55)यांनी सदर खोदकाम थांबवले होते.परंतू काही दिवसांनी परत शु माँल मालकाने मोठ्या ड्रील मशीनीच्या सहाय्याने पंधरा ते वीस फुट खोलीचे खड्डे खोदल्यामुळे निर्मल स्वीट मार्ट ची तीन मजली इमारतीला लागतच असलेल्या खड्ड्या मुळे बघता बघता क्षणातच जमीनदोस्त झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या व तपास अधिकार्यांच्या चर्चेतुन निश्पन्नास येत आहे*
*सदर घटनेची माहिती मीळताच अग्निशमन विभाग, पोलीस व महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊण त्वरीत विद्यूत पुरवठा खंडीत करुण इमारतीच्या मलब्याखाली कुणी दबले तर नाही ना याची शहनिशा करुण घेतली सदर तीन मजली इमारत कोसळून ही कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.सदर घटना दोन चार तास आधी घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती*
*शु माँल मालकाने मोठ्या मशीनीच्या सहाय्याने सुरु केलेले खोदकामामुळे व बुडोजर व ड्रील मशीनीच्या हदर्याने सदर घटना घडून निर्मल स्वीट मार्ट संचालकाचे जवळपास एक कोटीचे नुकसान झाले असुन निर्मल स्वीट मार्ट ला लागत असलेल्या राधास्वामी हार्ड वेअर या दुकानाची ही पडण्याची शक्यता बळावली असुन सदर घटनेत त्यांचीही एक भींत क्षतीग्रस्त होऊण काही अर्ध्याअधिक पडल्याचे दीसुन येत आहे*
*शु माँल चे मालक यांना वारंवार सुचना देऊण ही स्वमर्जीने सुरु केलेल्या खोदकामामुळेच सदर इमारत पडल्याचे बोलल्या जात असुन निर्मल स्वीट मार्ट संचालक यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊण वर्दळीच्या ठीकाणी कोणतेही सुरक्षीततेची व्यवस्था न करता मनमर्जीने खोदकाम करणार्या शु माँल मालकावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे*