*नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण*
*जिल्हा पालकमंत्री पदा करिता चुरस*
*सुनील केदार, डॉ नितीन राऊत व अनील देशमुख यांच्यात रस्साखेच*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेरः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे विस्तार नुकतेच पार पडले यात नागपूर जिल्ह्यातील तीन कद्दावर नेत्यांना कँबीनेट स्तरावर मंत्रिमंडळात शामील करण्यात आले यात नागपूर शहरी भागातील डॉ नितीन राऊत,सावनेर विधानसभा क्षेत्राचे सुनील केदार व काटोल विधानसभा क्षेत्राचे अनील देशमुख यांची वर्णी लागली असुन अद्याप खाते वाटपाचा मुहूर्त जरी निघाला नसून येत्या दोन दिवसात खाते वाटप होणार असल्याचे सुत्र आहे*
*अश्यात आता नागपूर जिल्ह्माचे पालकमंत्री कोण बननार यावर सगगळ्यांच्या नजरा लगल्या असुन काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठी हा विषय कसा हाताळतात यावर जिल्ह्यातील सर्व राजनैतीक जानकारांन सोबतच कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे*
*कोण होणार नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री*
*तसे बघितले तर जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिकच असोतो परंतू महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील तीन मंत्री असल्याने पेच फसत असल्याचे स्पष्टचीत्र आहे.यात कँबीनेट मंत्री सुनील केदार,डॉ नितीन राउत व अनील देशमुख या तीघांजवळ मागील 30 वर्षाचा राजकीय कारकिर्दीचा अनुभव असुन तीनही उम्मेदवार नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद यशस्वी रीत्या सांभाळन्यास सक्षम आहे.अश्यात महाविकास आघाडी सोबतच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठीना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला द्यावे याकरिता काय निकष असतील असा पेच आता फसत असल्याचेचित्र आहे*
*एकीकडे डॉ नितीन राऊत यांच्या नावावर विचार केला तर त्यांचे फक्त नागपूर शहर कार्यक्षेत्र असुन नागपूर शहराचाच अभ्यास असुन ग्रामीण क्षेत्रात त्यांची पाहिजे तेवढी पैठ नसून त्यांना नागपूर जिल्हा ग्रामीण मधे स्वरस नसल्याचे त्यांच्या संपूर्ण राजकीय अनुभवातुन व कार्यशैलीतुन दिसून येते*
*तर काटोल विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व कँबीनेट मंत्री अनील देशमुख यांचा जनसंपर्क फक्त काटोल नरखेड तालुका पुर्ताच मर्यादित असुन नागपूर शहरासह जिल्ह्यातील इतर अकरा तालुक्यात तीतके काम नाही याउपर ते त्यांची छबी शांत स्वभावाचे नेते म्हणून असल्याचा फटका ही त्याना पालमंत्री पद मिळण्यात अडथडा निर्माण करु शकतो.*
*याउलट वरील दोन्हीही नेत्यांपेक्षा सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व कँबीनेट मंत्री सुनील बाबू केदार यांचा नागपूर शहरा सोबतच संपूर्ण जिल्ह्यातील तेराही तालुक्यात थेट संपर्क,कार्यकर्त्यांची मोठी फळी व सततचा जनसंपर्क व थेट भेटीगाठी ही नेहमीचीच बाब आहे.तसेच जिल्ह्यातील ग्राम पंचायत, पंचायत समीत्या,जिल्हा परिषद,नगर पालिका,महानगर पालिका सहीत इत संस्थांच्या छोट्या मोठ्या निवडणूकीत थेट हस्तक्षेप असुन अनेक ग्राम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगर पालिका,महानगर पालिका सदस्यांना निवडून आणन्यात त्यांचा सिंसाचा वाटा नेहमीच असतो.व जमीनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ख़बीर पणे उभे राहत असल्याने व कार्यकर्त्यांना यथायोग्य मदत करण्याचा त्यांचा स्वभावामुळे त्याची वेगळीच ओळख कार्यकर्त्यात असुन सुनील केदार यांची काम करण्याची पद्धत सोबतच जिल्ह्यातील इर नाराज नेत्यांची समजूत घालुन त्यांना जोडून ठेवण्याचे कौशल्य त्यांना एक दबंग नेता म्हणून ओळखल्या जाते*
*नागपूर जिल्हाचा विचार केला असता नागपूर जिल्हा हा संपूर्ण देशातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असुन येथे राष्ट्रीय स्वयःसेव संघाचे मुख्यालय असल्याने या जिल्ह्याला देशातील इतर जिल्ह्या पेक्षा वेगळे स्थान व महत्व आहे.सोबतच केन्द्रिय मंत्री मा.नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचा गु्ह जिल्हा असल्याने येथील पालकमंत्री अभ्यासु ,सर्व गोष्टींचा ज्ञान असलेला व वेळ पडल्यावर दबंगगीरीने कठोर निर्णय घेणारा असला पाहिजे व वरिल तीनही गुण सावनेर क्षेत्राचे आमदार व विद्देमान कँबीनेट मंत्री सुनिकेदार यांच्यात असल्याने नागपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांची निवड जरी अपेक्षित मानली जात असली तरी असली परीक्षा ही 7 जानेवारी 2020 ला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार पाडणार्या निवडणूका ही एक मोठे निकष ठरु शकते.या निवडणूकीत वरील तीनही उमेदवारांपैकी जो उम्मेदवार जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणेल व सोबतच पंचायत मसत्यावर महाविकास आधाडीचा झंडा रोवेल त्याचीच वर्णी ही नागपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून लागेल असे जाणकारांचे मत आहे*