अखेर काँग्रेसचे खातेवाटप झाले!
महसूल थोरातांकडेच; अशोक चव्हाणांना पीडब्ल्यूडी
मुंबई :
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे तिढा अजून कायम असला,तरी काॅग्रेसच्या मंत्र्यांची खाती ठरली आहेत. महसूल खात्यावरून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील भांडण संपले आहे. बाळासाहेब थोरात हेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री असतील, तर अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असेल.
नितीन राऊत यांना उर्जा खाते देण्यात आले आहे.वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग आणि संदर्भ विभाग अस्लम शेख यांच्याकडे दिला जाणार असून वर्षा गायकवाड या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री असतील. सुनिल केदार वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि अमित देशमुख उच्च शिक्षण मंत्री होणार आहेत. विदर्भातल्या विजय वडेट्टीवार यांच्याकडे ग्रामविकास आणि पशुसंवर्धन मंत्रालय देण्यात आले आहे. यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण तर के.सी. पाडवी यांना आदिवासी विकास विभाग देण्यात आला आहे.
अन्य पक्षांचे वाटपही ठरले असून लवकरच ते जाहीर केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.