*काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांना जी.प. परिसरातुन अटक*

*काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांना जी.प. परिसरातुन अटक*

*२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण प्रकरण भोवले*

गढ़चिरोली विशेष प्रतिनिधि

गडचिरोली–  ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण करुन त्यांना रात्रभर बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले कॉग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांना आज पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून ताब्यात घेतले.

आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आपणास अडवून मारहाण केली. त्यानंतर कढोली गावाजवळच्या पुलावर नेऊन प्रचार न करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नेऊन रात्रभर बसवून ठेवले, अशी तक्रार श्री.ताडाम आरमोरी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलिसांनी १० ऑक्टोबर २०१९ रात्री आनंदराव गेडाम, त्यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यात काँग्रेसचे पलसगड-पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्रभाकर तुलावी यांचाही समावेश होता. याप्रकरणी बरेच दिवस फरार राहिल्यानंतर लॉरेन्स गेडाम व अन्य सहा जण पोलिसांना शरण आले. सध्या ते कारागृहात आहेत. परंतु आनंदराव गेडाम, प्रभाकर तुलावी, जीवन नाट व अन्य काही जणांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर ते फरारच आहेत.

आज जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. यासाठी अटकेच्या भीतीने प्रभाकर तुलावी येणार नाहीत, अशी चर्चा होती. परंतु ते सभागृहात चेहऱ्यावर रुमाल बांधून हजर झाले. त्यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेतही भाग घेतला. निवडणूक झाल्यानंतर बाहेर पडताच त्यांना आरमोरी पोलिसांनी ताब्यात घेतले. यांसदर्भात आरमोरीचे पोलिस निरीक्षक श्री.सूर्यवशी यांना विचारणा केली असता, श्री.तुलावी यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …