*सावनेर तालुक्यातील 6 जील्हा परिषद व 12 पंचायत समिती करिता मतदान शांततेत*
*एक लक्ष साठ हजार सहाशे एकतीस महिला पुरुष मदताचे बजावनार मतदानाचा हक्क*
*काँग्रेस व भाजप मधे मुख्य लढती तर काही ठिकाणी त्रिकोणी लढत*
*भाजप व काँग्रेसची प्रतिष्ठा मतपेटीत बंद*
*वाकोडी जी.प.क्षेत्रातील वाघोडा व वेकोली क्षेत्रात मतदान टक्क्यात घट*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समितीच्या निवडणूकी करिता आज सकाळी 7-30 पासून मतदान शांततेत पार पडले असून यात एक लक्ष साठ हजार सहाशे एकतीस मतदात्यांपैकी जवळपास 61 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे*
*तसे बघितले तर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्याकरिता चुरस दिसून येत असून कुठे भाजप काँग्रेस मधे थेट लढत तर कुठे तीरंगी लढत दिसुन येत आहे.तालुक्यातील केळवद जिल्हा परिषद करिता जिल्हा परिषदचे विरोधी गट नेते मनोहर कुंभारे जे आपले तेलगाव क्षेत्र आरक्षित झाल्याने क्षेत्र बदलून केळवद क्षेत्रातुन निवडनुक लढत असुन ते कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे खास मानले जात आहे तर बडेगाव क्षेत्रातून भाजप चे विजय देशमुख यांची सून क्रांती देशमुख यांना काँग्रेसच्या छाया बनसींगे तर वलनी जी.प.मधे काँग्रेसचे प्रकाश खापरे,राष्ट्रवादी चे किशोर चौधरी,भाजपचे अरुण सिंग यात तीरंगी तर वाकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात ही अशीच थेट लढत असुन दोन्हीही पक्षा करिता या प्रतिष्ठेच्या जागा मानल्या जात आहे*
*राज्यात सत्ता बदल झाल्याचा तसेच नागपूर जिल्ह्याला तीन कँबिनेट स्तराचे मंत्री पद मीळाल्या उत्साह संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात दिसून येत होता काही मतदान केद्रावर सकाळ पासुनच मतदात्यांची गर्दी होती तर काही ठिकाणी संथ गतीने परंतू शांततेत जवळपास 61 टक्के मतदान पार पडून सर्व उम्मेदवारांचे भवितव्य ईव्हिएम मशीन मधे बंद झाले*
*वाकोडी क्षेत्रातील वाघोडा व वेकोली त कमी मतदान*
*वाकोडी जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूकी करिता सगळ्यात कमी मतदान वाघोडा व वेकोली परिसरातील मतदान केन्द्रावर नोंदविन्यात आल्याचे वु्त्त असुन सकळी 7-30 पासुन ते 5-35 पर्यंत मतदानास सुरुवात झाली दोन्हीही क्षेत्र हे वेकोली कामगार बाहुल असून वेकोलीची सकाळ पाळीची ड्यूटी ही सकाळी 8-00 ला सुरु होत असल्याने सकाळी 7-30 ला सर्व कामगार आपल्या कर्तव्यावर निघतात व 4-00 ला पाळी सुटल्यानंतर जवळपास 4-30 ते 5-00चे दरम्यान घरी पोहचतात अश्यात मतदान करणार कसे असा प्रश्न निर्माण होत असुन मतदानाच्या दिवशी मतदान क्षेत्रात शासकीय सुटी घोषीत केल्या जात असते अथवा दोन तास आधी सुटी देण्याचा नियम असल्याचे सुत्र असुन सुध्दा अनेक कामगार मतदानापासुन वंचीत राहिल्याचे बोलल्या जात आहे.सदर कारणास जवाबदार कोण ?,सदर क्षेत्रात कमी मतदानास जवाबदार कोण?,एकीकडे निवडणूक आयोग शंभर टक्के मतदान करवून घेण्याकरिता विविध उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी टोकाचे प्रयत्न करत आहेत आणी वेकोली प्रशासन याची दखल न घेता निवडणूक निर्वाचन आयोग व प्रशासनाच्या प्रयत्नात पाणी मुरवीन्याचे कार्य करत मत प्रतिशत कमी करण्यास जबाबदार आढळून येत असल्याचे चित्र या कमी मतदान टक्केवारीतून निश्पन्नास येत आहे अश्या वेकोली अधिकारी कर्मचाऱ्यांनवर निवडणूक नीर्वाचन आयोग कोणती कठोर कारवाई कारणार काय अशी चर्चा कामगार वर्गातुन होत आहे*
*मतमोजनी ची जैय्यत तयारी*
*तहसील कार्यलयाच्या प्रांगणात दि.08-जानेवारीला सकाळी 10 वाजता पासून मतमोजनीला सुरुवात होणार असून मतमोजनीची संपूर्ण प्रक्रिया सावनेर उप विभागिय अधिकारी व निवडणूक अधिकारी अतूल म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली उप निवडणूक अधिकारी दिपक कारंडे(तहसीलदार सावनेर),नायब तहसीलदार चैताली दराडे,जयसींग राठोड सह संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था सज्ज झाली असुन मतमोजनी परिसरात शांतता व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेची कोंडी होऊ नये याकरिता सावनेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहीती शांतता पर्वक मतदान पार पडावे करिता परिश्रम घेत आहे*