*मुस्लिम बांधवांनी केले कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे जंगी स्वागत*
*सुफी संत शपी बाबांना नतमस्तक होऊण घेतला आशीर्वाद*
*आपल्या विश्वासाला तडा़ पडू देणार नाही!*
*सावनेर नगरीचे नाव संपूर्ण देशात लौकीक करण्याची संधी*
-सुनील केदार
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर महाराष्ट्र शासनात नवनियुक्त पशुसर्वंधन व दुग्ध वीकास मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील बाबू केदार यांचे कँबीनेट मंत्री बनल्या पीत्यर्थ सावनेर शहरातील मुस्लिम बांधवांनी शाल व पुष्पमाला घालून भव्य स्वागत केले*
*शहरातील जामा मश्जीद परिसरात दुपारी 2-00 ची नमाज़ अता केल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सर्वांचे लाडके नेते सुनील बाबू केदार यांना महाराष्ट्र शासनात कँबीनेट स्तराचे मंत्रीपद प्राप्त झाल्याबद्दल जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला याप्रसंगी जामा मश्जीद चे अध्यक्ष हाजी रफीकभाई शेख यांनी शाल व भव्य गुलाबांच्या फुलाचा हार घालुन प्रथम स्वागत केले.त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवानी आपल्या लाडल्या नेत्याला पुष्पगुच्छ देऊण पुढील भरिव कार्याच्या शुभेच्छा दील्या.*
*याप्रसंगीबोलतांना मा.कँबीनेट मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की बोलायला तर खुप काही आहे परंतु आता ही बोलण्याची वेळ संपूण काही करुण दाखविण्याची वेळ आहे.मा.काँग्रेस पक्षश्रेष्ठी,मा.मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व आपण सर्वांच्या आशीवादाने मला ज्या खात्याची जवाबदारी मीळाली आहे त्या खात्याचा कारभार अत्यंत पारदर्शी पणे करुण शेतकरी,शेतमजुर,सुशिक्षित अशिक्षीत बेरोजगार युवक युवतींच्या हाताला काम उपलब्ध करुण देणे.व आपली सर्वधर्म समभावाची परंपरा कायम ठेवत सर्व जाती धर्माचा आदर उराशी बाळगून आपल्या आशीर्वादाने समस्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात सावनेर नगरीचे नाव तुमचा हा सुनील केदार केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन करत म्हटले की “सबका साथ सबका विकास” हे बोलून अथवा पोकळ घोषणा करुण विकास होत नाही खरा विकास करायचा असल्यास गोर गरीब, दिन दुबळ्या,पीडित,शोषीत,वंचितांच्या सुखाःदुखाःत शामील व्हावे लागते.हवेत फीरुन तुम्ही नेता तर बनू शकता परंतू जननेता व लोकप्रतिनिधी नाही.जननेते बनण्याकरिता जनतेच्या प्रत्येक अडी अडचणीत खंबीर पणे त्यांच्या सोबत उभे राहून त्यांच्या समस्या सोडवीण्याचे प्रामाणिक प्रयत्नकरावे लागतात व आज जे आपण माझे स्वागत केले मला मान दीला हे त्याचेच प्रतिक आहे असे मला वाटते.आपण सर्वांनी जो विश्वास या सुनील केदारावर टाकला आहे त्या विश्वासाला कधीही तडा़ पडू देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करीत जामा मश्जीद परिसरात असलेल्या सुफी संत शपी बाबांच्या दर्गावर नतमस्तक होऊण बाबांचा आशीर्वाद घेतला हे विशेष*
*कार्यक्रमाचे संचालन जामा मश्जीद कमेटीचे सदस्य साबीर शेख यांनी तर प्रास्ताविक अल्प संख्यक सेल चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष साजीद शेख यांनी तर आभार नाजी़म शेख यांनी मानले*
*याप्रसंगी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,समाज सेवी मनोज बसवार,नगरसेवक सुनील चाफेकर,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,अकरम शेख,शमीम कुरैशी ,बब्बू शेख प्रामुख्याने उपस्थित होते*
*कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता माजी नगरसेवक दिलावर शेख,जाबीर शेख,मुश्ताखभाई,हाजी रहमू शेख,छोटू हाजी,हाजी नबीभाई,मोहम्मद भाई,बिट्टू शेख,सोनू शेख,वसीम शेख,कम्मो शेख,करीम शेख,सज्जोभाई,बाबाभाई सह जामा मश्जीद कमेटीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.तर सदर आयोजनात शेकडो मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रमात रंगत आणली*