वनसडी वनपरिक्षेत्रातील वनसंपदा धोक्यात
अधिकाऱ्यांच आक्षम्य दुर्लक्ष
आवारपूर प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना जिल्ह्यातील वनसंपदेचा पाया कोरपना तालुक्यातून दिसून येतो.पारडी, कोरपना, वनसडी,गडचांदूर, पाटण,शेणगाव, माणिकगड किल्ला, जिवती असा दुभाजून गोडपीपरिकडे त्यामुळे वनसडी येथील अधिकाऱ्यांनी याभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सविस्तर वृतानुसार वनसडी बिट तसेच कार्यालयात भोंगळ कारभार सुरू असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळते आहे.सुत्रांच्यामहितीनुसार येथील मुख्य अधिकारी मुख्यालयात नसून या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे याकडे वरीष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनि केली आहे.
काही दिवसांपूर्वी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या “तुतुमैमै” ची चर्चा चांगलीच नागरिकाच्या कानात गुंजल्याने या प्रकरणाचे नेमके कारण नागरिकांना समजले नाही.त्यामुळे ” दाल मे कूच काला है’ ची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच विराजमान झालेल्या अधिकारी आणि येथील कर्मचारी यांच्यातील वाद कोणत्या विकोपाला येणार ही वेळच सांगेल.
वनसंपदेने नटलेल्या माणिकगड च्या रांगा गडचांदूर कराना तर भुरळच पडतात.परंतु सध्या जंगल कटाई जास्त होत असल्याने गडचांदूर ला लागलेल्या विरुर तसेच जिवती वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.
गडचांदूर वनसडी, कोरपना पारडी, तसेच विरुर, जिवती राजूरा वनक्षेत्रात काही भागात नाले सुद्धा अस्तित्वात आहे.या नाल्यातून देखील अवैध रेतीतस्करी होत असल्याने वनसंपदे बरोबर शासनाचा महसूल सुद्धा बुळत आहे.त्यामुळे वनविभाग च्या वरिष्ठ अधिकारी यांनी या भागातील अधिकारी वर्गाकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी केली आहे.वनसडी वनपरिक्षेत्रातील वनसंपदा धोक्यात .
अवैध मार्गाने साग आदी झाडाची कटाई करून खुल्या बाजारत विकल्याजात आहे.
या जंगलातून .अवैध मार्गाने वाळू चा उपसा होत आहे. या कडेही लक्ष देण्याची गरज आहे.