*धर्मरावबाबांच्या हस्ते तालुकास्तरीय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन*

*धर्मरावबाबांच्या हस्ते तालुकास्तरीय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन*

 गडचीरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

एटापल्ली- येथील समूह निवासी जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एटापल्ली पंचायत समितीचे सभापती शालिकराव गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती जनार्धन नल्लावार, माजी सभापती बेबीताई लेकामी, संवर्ग विकास अधिकारी किशोर गजलवार, अभय पुण्यमूर्तीवर, माजी उपसभापती नीतेश नरोटे, पं.स.सदस्य वनिता मडावी, संगीता दुर्गे, निर्मला गावडे, रामजी कत्तीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, नगरसेविका शारदा उलीवार, सुनीता चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर नृत्य करीत आमदार धर्मरावबाबांचे स्वागत केले. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून सलामी दिली. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून अतिथी व ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विविध खेळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे, तर सूत्रसंचालन कविता आंबोरकर व नरेश चौधरी यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र कोकुडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …