*रेल्वे खाली येऊन तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू*-*नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळ ची घटना*

*नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळ ची घटना*

*रेल्वे खाली येऊन तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू*

*मृतकांमध्ये 1 स्त्री आणि 2 पुरुष मजुरांचा समावेश.*

*विशेष प्रतिनिधी बुटीबोरी*

*पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व मजूर परप्रांतीय असून परिसरतील कारखान्यात काम करण्याकरिता परिसरात वास्तव्यास होते.*

*आज बुटीबोरी ला आठवडी बाजार असल्यामुळे संध्याकाळी साडे सहा च्या सुमारास तीघे गोदावरी नगर जवळ रेल्वे रूळ ओलांडून बाजारात जात होते.तेव्हाच दोन्ही रुळांवर विरुद्ध दिशेने रेल्वे गाड्या आल्या आणि घाबरलेले तिघे जण एका रेल्वे खाली चिरडले गेले.*

*तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.*
*मु्तकात शारदा शेखलाल सयाम (१९),कमलेश गोधनलाल मरसकोल्हे (२२) आणि योगेश उईके (२०) तिनही राहणार मुराही टोला, जिल्हा शिवणी,मध्यप्रदेश असे या अपघातात मृत्यू झालेल्याची नावे असून माहिती अशी की मृतक हे बुटीबोरी नजीकच्या लॉ कॉलेज च्या बांधकामावरील कामगार म्हणून कामाला होते.आज बुटीबोरी येथील शुक्रवार चा आठवडी बाजार असल्याने त्या निमीत्त ते बुटीबोरीकडे येतांना रेल्वे रूळ ओलांडत असतांना रूळावर अचानक रेल्वे गाड्या आल्यामुळे त्यांचा गोंधळ झाला.त्यामुळे त्यांना आपला तोल सावरता आला नाही.ज्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचारयासह बुटीबोरीचे पोलिस घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले.घटनेची नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …