महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे महिला मेळावा संपन्न.
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे महिला मेळाव्या अंतर्गत हळदी कुंकू, उखाणे स्पर्धा, बादलीत चेंडू टाकणे, सत्कार, व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेची पुजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
मा. सौ. अस्मिता बागडे माजी उपसरपंच ह्यनी स्त्रियांना आपले रक्षण कसे करावे ह्यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मा. डॉ. सौ. सुवर्णा येवले प्राध्यापिका (सरस्वती विद्यालय कोराडी) ह्यनी ऐतिहासिक कालिन स्त्रीयांना होणारे जसे सावित्रीबाई फुले ह्याना किचड शेण मारायचे इतके होऊनही सावित्री बाई मागे हटल्या नाही असे अनमोल मार्गदर्शन केले. सौ. बागडे ताईला शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मधुन श्री. प्रकाश कोहळे ह्यानी केन्द्रात होणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. मान्यवरांच्या उपस्थिती मा. सौ. वैशाली तरारे व भावना तळखडे ह्यानी उखाणे बादलीत चेंडू टाकणे ह्या स्पर्धेचे परीक्षण करून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रकाश कोहळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शालु टेकाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मन्दा सोनुरकर, नलिनी बेडेकर, आशिष भालेराव, पूनम सय्यामे वैशाली अड्रस्कर रुपल टेकाडे ह्यानी अथक परिश्रम घेतले.