*ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांचा नियमांना खो…*
*मुख्यध्यापका सह सर्व शिक्षक करतात अप-डाऊन*
अहेरी प्रतिनिधी -श्रीकांत दुर्गे
*पेरमिली:- पेरमिली येथील जि.प.शाळा पेरमिली येथील मुख्यध्यापकसह सर्व शिक्षक मुख्यालय न राहता आलापल्ली व अहेरी वरुन ये-जा करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन एकीकडे विद्यार्थी घडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असतात. त्यांच्या दुरुपयोग करत असल्याचे चित्र पेरमिली येथील जि.प.शाळेतील मुख्यध्यापक करत असल्याचे दिसून येत आहे.*
*ग्रामीण भागातील गोर गरिब परिवारातील पाल्य अशिक्षीत राहु नये,त्यांना योग्य शिक्षण मीळून त्याचा व त्याच्या परिवाराचा आर्थिक व मानसिक विकास व्हावा,त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊण ते दैशाचे सुज्ञ नागरिक बनून देशाच्या विकासित त्यांचे योगदान असावे याकरिता शासनव्दारे आनेक योजना राबविण्यात येतात त्याकरिता प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांस कर्तव्याच्या मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असते व तसा नियम ही आहे.हजारो हजार रुपये पगारासह इतर भत्ते घेऊणही कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन शासकीय नियमांना धाब्यावर ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार कोण असे अनेक प्रश्न आजही निरुत्तरच आहेत याऊपर शाळेच्या वेळेवर न पोहचता तास दिड़तास उशिरा पोहचून सुध्दा परतीची घाई अश्यात शासनाच्या नियमांचा फज्जा उडवत मनर्जीने कारभार करुण विद्यार्थ्यांच्या जिवनाचा खेळखंडोबा करणार्या योग्य कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.*
*असाच प्रकार उच्च प्राथमिक शाळा पेरमिली सह सर्वत्र राजरोस पणे सुरु असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होऊ लागले असल्यामुळे मुख्यध्यापक सह शिक्षकसुद्धा मुख्यालयी राहावे अशी मागणी पेरमिली येथील पालक वर्ग करत असुन तालुका व जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी ग्रामीण क्षेत्रातील शाळेवर आकस्मिक दौरा करुण जे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे*