*वसंत पंचमी ला शमी विघ्नेशास फुलांचा सेज व आरास*
*भव्य दिव्य रोशनाई ने सजनार आदासा तीर्थक्षेत्र*
*महा आरती व महाप्रसादाचे आयोजन*
*भाविकांची उसळणार लाक्षणिक गर्दी*
*प्रतिनिधी सूरज सेलकर सावनेर*
*सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील विदर्भातील अष्ट विनायका पैकी अग्रगण्य “अदोश क्षेत्र आदासा” येथील स्वयंभू श्री शमी विघ्नेश (गणपती) मंदिरात दि.30 जानेवारी 2020 रोज गुरुवारला वसंत पंचमीच्या पावन पर्वावर मंदिरातील भव्यदिव्य स्वयंभू श्री गणेशाच्या मुर्ती सह संपुर्ण गर्भगु्हाला पुर्णपणे आकर्षक फुलांनी व सजवून फुलांची सेज व आरास व्दारे सजवील्या जाणार आहे*
*वसंत पंचमी च्या पावन पर्वावर श्री गणेशाचे असे मन मोहक रुप बघन्याकरिता हजारो हजार भाविकांची अलोट गर्दी बघता मंदिर व्यवस्थापन कमेटी सज्ज झाली असुन वसंत पंचमी उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असुन संपूर्ण मंदिर व परिसर सुंदर रोशनाई ने सजविल्या जात असुन श्री गणेशाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकरिता भव्य असे महाप्रसाद वितरणाचे आयोजन हि मंदिर व्यवस्थापन कमेटी कडून करण्या आली असल्याची माहीती गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा चे सचिव श्रीकांत पांडे यांनी देत वर्षातून एकदा अश्या सुंदर श्रुंगारने नटलेल्या श्री गणपति बाप्पाचे भव्य दिव्य दर्शनाचा लाभ घेण्याची विनंती भाविकांना केली आहे*