*71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप*
*सामूहिक संविधान वाचन*
*प्रतिनिधी सुरज सेलकर व्दारे*
*सावनेरः 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो सकाळ पासूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांचीची चिवचिवकट व मधुर देशभक्ती गीतांचा कर्णप्रीय आवाज भारत माता की जय,महात्मा गांधी की जय,वंदे मातरम् चा जयघोष करत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व प्रत्येक शासकीय निम शासकीय कर्मचारी व नेते मंडळाची ध्वजारोहणाची लगबग तर हातात झंडे घेऊण मोटरसाईकल रस्त्यावर ओसांडून पडणारी तरुणाईंचे देशप्रेम हे या दिनाचे विशेष वैशिष्ट्य असते*
*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे हस्ते व स्वातंत्रतेचे प्रतीक माणले जाणारे जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांचे हस्ते सचिव विजय बसवार यांचे उपस्थितीत शेकडो गणमान्यांच्या उपस्थितीत सामुहिक ध्वजारोहण पार पडले*
*सकाळी 9-30 ला नगर परिषद हायस्कूल च्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार चैताली दराडे,पो.नी.अशोक कोळी,नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नगरातील सर्व शाळा महाविद्यालयील विद्यार्थी नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस पथक,होमगार्ड पथक,एनसीसी पथक आदिंनी पथ संचालन करुण राष्टध्वजाला मानवंदना दीली.ध्वजारोहणा नंतर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजनाचा उपस्थित मान्यवरां सह नगरवासीयांनी लाभ घेतला*
*जयस्तंभ बाजार चौक येथे संपन्न ध्वजावंदनास नगर परिषद हायस्कूल सावनेर,सुभाष प्राथमिक शाळा हिंन्दी ,मराठी, अभ्यंकर प्राथमिक शाळा,पलीया हिंन्दी आदी शाळेचे विद्यार्थी शिक्षकवुंदा सह नगर सेवक सुनील चाफेकर,दिपक बसवार,निलेश पटे,शपीक सैय्यद, माजी नगर सेवक तेजसिंग सावजी,लक्ष्मीकांत दिवटे,शैलेश जैन,गोपाल घटे,प्रा.कमल भारव्दाज,अश्विन कारोकार,दिलीप घटे,सादिक शेख,इमरान शेख,रवी काळबांडे,दिलिप फाले,ललित कुमार हंसराज,गेदलाल कमाले,मुकुंदा नाईक,श्री खुबाळकर,सुमुख लाखानी आदी प्रामुख्याने उपस्थीत होते प्रभात फेरीत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने खाऊ वितरीत करण्यात आले*