गडचांदूर पोलिसांनी चालवला २५ लाख ९५ हजाराच्या जवळपास अवैध दारूवर रोलर.
(ठाणेदाराच्या आगमनानंतर तीसरी मोठी कारवाई.)
कोरपना प्रतिनिधि – गौमत धोटे
चंद्रपूर :- गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भरती यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जानेवरी २०२० रोजी २५ लाख ९४ हजार,८५० रुपयांची देशी,विदेशी कंपनीची अवैध दारू न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आली.यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय आकेवार तसेच उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिस कर्मचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.ठाणेदार भारती याठिकाणी रूजू झाल्यापासून २८ सप्टेंबर १९ रोजी ७३ लाख,४ डिसेंबर १९ रोजी ४९ लाख ४१ हजार १२० आणि आता तीसऱ्यांदा २५ लाख ९४ हजार ८५० च्या जवळपास एकुण ६७ गुन्ह्यात जप्त केलेली अवैध दारू नष्ट करण्यात आली आहे.कोरपना तालुका हा यवतमाळ,आदीलाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने गडचांदूर शहरात सहजपणे अवैध दारूची वाहतुक होत असते.आजपर्यंत पोलिसांनी हजारो दारूच्या कारवाया केल्या आणि कारवाईचे सत्र सतत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे हे मात्र.