*मामाने भाच्याच्या डोक्यात काठीने वार करुण पोहचविले यमसदनी*

*मामाने भाच्याच्या डोक्यात काठीने वार करुण पोहचविले यमसदनी*


*दुर्दैवी घटनेनी वरवटात तनावपुर्ण वातावरण*


*हत्यारा मामा जेरबंद*

*विशेष प्रतिनिधी चंद्रपूर*

*चंद्रपूर शहराच्या सीमेलगत असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्रा जवळ असलेल्या वरवट या गावी चार वर्षीय चिमुकल्या मुलाची त्याच्याच मामाने निर्दयतेने हत्येने एकच खळबळ उडाली आहे*
*आज सकाळी साडेनऊ वाजता च्या सुमारास ही घटना घडली.दीक्षांत तावडे असं या चार वर्षीय चिमुरड्याचे नाव आहे*
*दीक्षांत आपल्या घरापुढील अंगणात खेळत असताना त्याच्या नात्यातील मामा असलेल्या रंगनाथ गेडाम- 40 यांनी अंगणात पडून असलेल्या एका लाकडी काठीने चिमुरड्याच्या डोक्यावर जबर वार करत त्याची हत्या केली. घटना नजरेस पडताच आरडा-ओरडा झाल्याने घटनास्थळी नागरिक पोहचत असतानाच हातात काठी घेऊण असलेल्या रंगनाथ लोकांना दिसला. ग्रामस्थांनी धावून जात रंगनाथला पकडले. यानंतर एका खांबाला बांधून रंगनाथची मनसोक्त धुलाई केली.*
*दरम्यान सदर हत्येची माहिती वार्याच्या वेगाने सर्वत्र पसरुन दुर्गापूर पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठत खांबाला बांधून असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.*

*रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या चिमुरड्या दीक्षांतला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. या ठिकाणी पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान रंगनाथ गेडाम याने चिमुकल्या दिक्षांत ची हत्या कुठल्या कारणाने केली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.* *गावातील नागरिकांनी रंगनाथची मानसिक स्थिती बरी नव्हती असे सांगितले असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्याच्या या हत्येमुळे गावात शांततापुर्व परंतू तणावाचे वातावरण निर्माण आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …