कृषिपंपासाठी शेतकऱ्यांची विद्युत वितरण कार्यालयावर धडक
भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तालुक्यातील प्रलंबित शेतकऱ्यांची मागणी*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना तालुक्यातील अनेक शेतकरी कृषिपंपाकरीता डिमांड भरून प्रलंबित होते व तालुक्यातील शेकडो नागरिकांचे फाँल्टी मीटर बदलविणे व वाढीव वीज बिल कमी करणे याकरिता भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीवर धडक देऊन उपविभागीय अभियंता श्री.इंदूरकर यांना निवेदन दिले.
कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी डिमांड भरले आहेत परंतु आद्यपही त्यांना विद्युत जोडणी प्राप्त झाल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे,त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाही,यासर्व बाबींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये फाँल्टी मीटर असल्यामुळे नागरिकांना वाढीव वीज बिल यायचे त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीचा फटका बसत होता,या सर्व प्रकरणाच्या संदर्भांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची भेटून घेऊन सदर प्रश्नांबाबत माहिती दिली.
सदर प्रकरणाची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन विद्युत वितरण कार्यालय येथे श्री.इंदूरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व सदर प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
आपण या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यावर आपण उचित कार्यवाही करू असे उपकार्यकारी अभियंता यांनी दिले.
यावेळी कोरपना तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.