*कलाहर्ष 2019-20 राज्य स्तरिय चित्रकला स्पर्धा संपन्न*
*तालुक्यातील अनेक शाळांचा उत्सफुर्त सहभाग*
*अँब्स्ट्ँक्ट आर्टस् अँँकँडमी चा उपक्रम*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेल व्दारे*
*सावनेरः सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत कला विषयाला शासनातर्फे प्राधान्य देण्यात येत आहे नवीन कल्पनेनुसार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमधील असणाऱ्या कलागुणांचा विकास व्हावा, नियमित अभ्यास करीत असतांनाच विद्यार्थी इतरही कलागुणांने संपन्न व्हावा तसेच विद्यार्थ्यांचा अंगी असणारे सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश शालेय दृष्टिकोनातून यशस्वीरित्या साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ, पुणे यांचा वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित “कलाहर्ष – २०१९-२० राज्यस्तरीय” चित्रकला स्पर्धेचा भव्य कलाउपक्रमात सहकार्य करण्यासाठी कला महामंडळाचा सम्मतिने abstract arts academy सावनेर यांचा तर्फे सावनेर क्षेत्रातील ई. शाळेत ईयत्ता के. जी. पासून ते ईयत्ता १० वी पर्यंतचा विद्यार्थ्यांचा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा राबविण्यात आली*
*या स्पर्धेत विद्यार्थांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी होऊन सुंदर मनमोहक चित्रे रेखाटली व रंगविली. तसेच त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कलागुणांचे प्रगटीकरण त्यांनी आपल्या बोलक्या चित्रांचा माध्यमातून साकारून दाखविले त्यांचा या गुणांचे ई. शिक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेचा यशस्वीतेकरिता abstract arts academy सावनेर चे कलाशिक्षक श्री. अमर रायकवाड सर यांनी भरपूर परिश्रम घेतले.*
*तसेच सुभाष मराठी प्राथमिक शाळा सावनेर येथील मुख्याध्यापक श्री. सुर्यवंशी सर, सुभाष हिंदी प्राथमिक शाळा सावनेर येथील मुख्याध्यापक श्री. दीक्षित सर, जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर येथील मुख्याध्यापक श्री. मोवाडे सर, रामगणेश गडकरी पब्लिक स्कूल सावनेर येथील मुख्याध्यापक श्री. टेकाडे सर, ट्विंकल किड्स कॉन्व्हेन्ट सावनेर येथील मुख्याध्यापिका सौ. काकडे मॅडम, स्कॉलर ट्युशन क्लासेस सावनेर येथील संचालक श्री. पटेल सर, राष्ट्रीय उच्च प्राथमिक शाळा खापा येथील मुख्याध्यापिका सौ. कोंढलवार मॅडम, जवाहर हायस्कूल खापा येथील मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर, भिकुलाल चांडक हायस्कूल केळवद येथील मुख्याध्यापक श्री. देशमुख सर, ऋषीप्रसाद ट्युशन क्लासेस केळवद येथील संचालक श्री. सोनवणे सर, एज्युकेशन पॉइंट पब्लिक स्कूल लोधीखेडा येथील मुख्याध्यापक श्री. घुगल सर, ई. शिक्षकांनी या स्पर्धेत मोलाचे सहकार्य करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.*
*सर्वांचा सहकार्याबद्दल abstract arts academy सावनेर येथीले संचालक श्री. प्रेमदास रायकवाड सर यांनी सर्वांचे आभार मानले.*