*विदर्भ पटवारी संघाचे अकरा मागण्यांसाठी आंदोलन*
*30 जानेवारीला काळ्या फिती लावुन निदर्शने*
कुही प्रतिनिधी -निखील खराबे
*कुही:- विदर्भ पटवारी संघाच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाच्या आर्थिक व सेवा विषयक प्रलंबित अकरा मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना निवेदन देण्यात आले*
*निवेदनात नवनिर्मिती तलाठी साझांची अमंलबजावणी करने,नविन लँपटँप व प्रिंटर मिळने,सातव्या वेतन आयोगानुसार प्रगती योजनेची अंमलबजावणी करने, अतिरिक्त कार्यभाराचा पाच टक्के मेहनताना मिळने, तलाठी कार्यालयाचे प्रलंबित भाडे मिळने, तलाठी व कोतवालांचे रिक्त पदे भरने,निवडनुकीतिल अतिकालीत भत्ते मिळने,पिएम किसान व माहात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेतील पुढील कामे न देणे, अवैध गौन खनिज उत्खनन व वाहतुकीत होणारा त्रास ,स्थायीकरन करने,महसुल मंडळ अधिकारी यांना पिक कापनी प्रयोगाचे समप्रमाणात विभागनी करने या अकरा मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघाच्या वतिने तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली*
*वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना देण्यात आले पटवारी संघाचे आंदोलन चार टप्प्यात होणार असून 30 जानेवारी ला पहील्या टप्प्याचे आंदोलन करण्यात आले याची दखल शासनाने घेतली नाही तर 03 फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुकप्रदर्शन करण्यात येणार आहे 07 फेब्रुवारी ला सविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा करणार असुन 12 फेब्रुवारी 2020 ला सामुहिक रजा आंदोलनाचा ईशारा निवेदणातुन देण्यात आला आहे.*
*आजच्या पार पडलेल्या आंदोलनात मंडळ अधिकारी संघटनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष हिंदलाल उके.विदर्भ पटवारी संघटनेचे उपाध्यक्ष ए.बी.ईंगळे,मंडळ अधिकारी डी.पी.पवार, श्री.बेले,तलाठी राँजर गेडाम, माहादेव डाखोर माहादेव डाखोरे,डी.एच.डोये,एस.आर.मुरकुटे,एम.टी.झाडे,पि.एस.पायघन,पि.जी.चंदेल,आर.के.तभाने,व्ही.एम.कांबळे,पी.पी.गरीट,एच.एम.शेवळे,एन.व्ही.हरने,टी.एम.हिंगवे,एस.एम.बारईकर,व्ही.एम.पडोळे मँडम,रामटेके मँडम,आकाश शेंडे,स्नेहदिप मेश्राम, तळोकर,पि.एम.झाडे,उपस्थित होते.*