पोलिस ठाण्यातच घेतले महिलेने विष
जिवती येथील घटना/मनसेची ठाणेदारावर कारवाईची मागणी
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
जिल्ह्यातील दारू बंदी जीवावर बेतली असून पतीवर पोलिसांनी खोटा गुन्हा नोंद केल्याने पत्नीने पोलिस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३० जानेवारी रोजी जिवती पोलिस ठाण्यात घडली.पिडीत महिलेला स्वतः पती आणि नातेवाईकांनी आँटोने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणले.माणुसकीची जान नसलेल्या भारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले आणि सध्या जिवती पोलिस ठाण्याचे काम पाहत असलेल्या ठाणेदारांनी सदर महिलेची मदत करण्या ऐवजी “तुम्हीच दवाखान्यात घेऊन जा” अशी तंबी नातेवाईकांना दिल्याची माहिती महिलेच्या आईंनी ला दिली आहे. ठाणेदाराचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदारावर कारवाई करावी अशी मागणी इतरांसह मनसे राजूरा विधानसभा अध्यक्ष महालींग कंठाळे यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की विषप्राशन करणाऱ्या महिलेची आई अवैध दारूची विक्री करते.गुप्त माहितीच्या आधारे काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून तिच्या घरून दारू साठा जप्त केला होता.मात्र महिलेवर गुन्हा दाखल करण्यात ऐवजी पोलिसांनी तिच्या जावयावर गुन्हा नोंद केला.”दारू माझ्या घरात सापडली यासाठी माझ्यावर कारवाई करा,यात माझ्या जावयाचा काहिच दोष नाही,तो पत्नी सोबत वेगळा राहतो” अशी विनंती सदर महिलेनी ठाणेदाराकडे केली परन्तु कोणताही प्रतिसाद न देता जावयावरच गुन्हा दाखल करण्यात आला.ठाणेदारांनी बोलवल्या प्रमाणे आम्ही सकाळी पोलिस ठाण्यात गेलो असता “जावयाला बोलवा, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.” असे सांगण्यात आले.सदर प्रकरणात पतीचा कोणताही सहभाग नसल्याने सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाहून पत्नीने पोलिस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी ठाणेदार स्वतः हजर होते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे महिलेच्या आईंनी सदर प्रतिनिधींना सांगितले.घटना काहीही असो पण माणुसकीच्या नात्याने ठाणेदारांनी मदत करायला हवी होती अशी चर्चा असून ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.आता ठाणेदारावर कारवाई होणार की इतर प्रकरणा प्रमाणेच याचीही पद्धतशीरपणे विल्हेवाट लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.