*क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जयंती संपन्न*
*भव्य लेक शिकवा अभियानाचे आयोजन*
*मातु्पुजन व हळदीकुंकू*
सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर
सावनेर – न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त लेक शिकवा अभियाना अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमात विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण, मातांसाठी हळदीकुंकू तसेच मातृपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.*
*याप्रसंगी सावनेर शहरीच्या नगराध्यक्षा सौ.रेखाताई मोवाडे शिक्षणसभापती सौ.स्वाती कामडी .सौ.सोनाली तुषार उमाठे,डाॅ.मोनाली पोटोडे सौ.आशा कराळे , मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे प्रामउपस्थित होत्या*
*सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.*
*यावेळी डाॅ.मोनाली पोटोडे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या दातांची आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षा रेखाताई मोवाडे यांनी शिक्षणाचे महत्व विशीद् करुण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.*
*इयत्ता २री ,३री ,४थी, आणि ५वी च्या विद्यार्थ्यांनी महिला शिक्षण व इतर विषयावर समाज प्रबोधन करणारे नाटके प्रस्तुत करुण उपस्थितांचे मनोरंजन करुण आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले*
*तत्पुर्वी अभ्यंकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता झाडे यांनी महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनीवर प्रकाश टाकत आजच्या काळात महिला शिक्षणाचे महत्व याविषयावर मार्गदर्शन करत आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या उपस्थिती व कार्यामुळे समाजात आपले स्थान निर्माण करुण देशाच्या विकासात आपले सहभाग नोंदवत आहे प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या कांध्याला कांधा मिळवून आजची महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्वप्नाला साकार करत असल्याचे मोनोगत व्यक्त करत म्हटले की एक महिला सुशिक्षित झाली की संपूर्ण परिवार व समाज सुशिक्षित होतो असे आपल्या प्रस्ताविकातुन म्हटले*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दिप्ती खोब्रागडे तर आभार प्रदर्शन सौ.नर्मदा डवरे यांनी केले.यासाठी कु.ज्योती कोडापे,सौ.सुनंदा राऊत, श्री.माणिक रामटेके,श्री..सुरेश गजभे,श्री..नरेन्द्र चापरे सौ.प्रणाली मोरे,कु.प्रज्ञा बागडे,कु.अंजली पगारे ,विजया वर्मा,अनुसया नारेकर यांनी विशेष सहकार्य केले.