*भव्य आरोग्य शिबीराचा चारशेच्या वर ग्रामस्थांनी घेतला लाभ*
*ख्यातीप्राप्त अस्थिरोग,नेत्ररोग,ह्रदयरोग तसेच इतर व्याधी तज्ञांनी केला उपचार*
*शिबीरात औषधी तसेच चश्म्याचे निशुल्क वाटप*
*ग्रामस्थांनी अनुभवला डॉक्टरी पेशा फक्त व्यवसाय नसुन सामाजिक बांधिलकी चा आभास*
*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरःशहरातील काही युवा डाँक्टरांनी तालुक्यातील नांदा सालई या गावात दि.5 फेब्रुवारी ला गावातील नागरिकांन करिता भव्य असे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करुण सदर शिबीराचा चारशे च्या वर महिला पुरुष गावकर्यांनी सदर आयोजनाचा राभ घेऊण त्यांचे आयोजनाचे फलीत केले*
*सदर शिबीरात आस्थीरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ,हु्दय रोग,रक्त शर्करा,मधुमेह,रक्तचाप,दमा तसेच इतर व्याधींवर सुखकर्ता आर्थोपेडीक हाँस्पिटल चे अस्थीरोग तज्ञ डॉ.गुंजन धुंडेले,जेएसके सुपर स्पेशलिस्ट डोळ्याचा दवाखान्याचे नेत्ररोग तज्ञ डॉ जयंत कडसकर,पुण्यानी हाँस्पिटल चे डॉ शिवम पुण्यानी,विवेकानंद आरोग्य सेवा बहचद्देशीय शिक्षण संस्था न चे नेत्ररोग तज्ञ डॉ आय.एन.खान सह इतर डाँक्टर यांनी उपस्थित चारशे च्या वर ग्राम वासीयाची तपासणी करुण सर्वांना मोफत औषधी तसेच 188 महिला पुरुष गावकर्यांना मोफत चष्मे वाटप करुण डाँक्टरी हा व्यवसाय नसून सामाजिक बांधीलकी आहे असा परिचय दीला*
*याप्रसंगी शिबीराला उपस्थित सर्व डाँक्टरांचे सालई च्या सरपंच सौ.संगीता मेश्राम,उप सरपंच गजानन मीरचे,ग्राम सचिव प्रशांत घुगल आदिंनी पुष्पगुच्छ देऊण स्वागत केले तर कार्यक्रमाचे यशस्वीते करिति जितेंद्र मोहतकार सह सर्व ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले*