*हिंगणघाट जळीतकांडावरून महादुलात निषेध*
*महादुला येथे विविध संघटने कडून शांती मार्च चे आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि- दिलीप येवले
कोराडी– *हिंगणघाट येथील प्राध्यापिका तरूणीवर पेट्रोल टाकून तिला केला जिवंत जाळणा-या माथेफिरुंविरूध्द कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी नगर पंचायत, शिक्षणसंस्था, सामाजिक कार्यकर्त यांच्या वतीने कोराडी पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक जयंत गंगवार यांना शुक्रवारला निवेदन देण्यात आले. सदर तरूणीची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रशन एेरणीवर आला आहे माथेफिंरू आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी सात फेब्रुवारीला महादुला टी पाँईट येथून शांती मार्च काढण्यात आला मार्चमध्ये परिसरातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी महिला सहभागी झाल्या होत्या घटनेतील आरोपी वर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी महिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी नगर पंचायत महादुला अध्यक्ष राजेश रंगारी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाँ. शरयू तायवाडे, प्राचार्य अमित मलिये,वर्षा वैध, कांचन कुथे, सरपंच सुनिता चिंचोरकर, विजय राऊत, धनंजय भालेराव, चंद्रप्रकाश आगासे, वकिल शेख, ढवळे, रितेश मांडवकर, राजेश गजभार, आदीची उपस्थिती होती.*