आरटीओ विभागातील अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
विशेष प्रतिनिधि
नागपूर : प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर शहर येथील मोटार वाहन निरीक्षक सुरेश पोलानी ( ५७ ) यास ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारयांनी रंगेहात पकडून पोलिस स्टेशन सीताबर्डी येथे गुन्हा दाखल केला आहे . यातील तक्रारदार हे प्लॉट नंबर ७५० आजादनगर , इंदोर , मध्यप्रेदश येथील रहिवासी असून ते एका ट्रॅव्हल्स कंपनीचे मॅनेजर म्हणून काम करतात . तक्रारदाराच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस इंदोर ते नागपूर चालतात . खुर्सापार चेक पोस्ट येथील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलिनी याने तक्रारदारास सर्व बसेसचे महिन्याचे ८० हजार रुपये एंन्ट्री म्हणून लाचेची मागणी केली . मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विाग नापर येथे तक्रार नोंदविली . या तक्रारीवरून तडजोडअंती ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे . सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रशमी नांदेडकर , अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार , यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक संदीप जगताप , पोलिस हवालदार प्रवीण पडोळे , सुनील कळंबे , प्रभाकर बले , लक्ष्मण परतेती , वकील शेख यांनी केली आहे .