*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे योगा शिबिराचा समारोप संपन्न*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा – राममंदिर येथे योगा शिबीर घेण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. रंगराव ठाकरे योग गुरू तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री लक्ष्मण काळे हे होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ठाकरे सरांनी योगा बद्दल* *मार्गदर्शन केले. आणि त्यानी सांगितले की योगामुळे शरीर निरोगी रहाते. मान्यवरांच्या हस्ते सर्व योग साधकांना प्रमाणपत्र देण्यात आले*.
*प्रास्ताविक मधुन श्री प्रकाश कोहळे हानी केन्द्रात होणाऱ्या ईतर उपक्रमची माहिती दिली*.
*कार्यक्रमाचे संचालन श्री प्रकाश कोहळे यांनी तर आभार प्रदर्शन सो. शालु टेकाडे ह्यनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर नलिनी बेडेकर, सिमा बल्लारे, वानखेडे ताई पुनवटकर, हर्षेताई हर्षेसाहेब, कनोजे साहेब, सोनकुसरे ताई, राऊत ताई हानी अथक परिश्रम घेतले.*