अखेर…. हिँगणघाट पिडितेने घेतला अखेरचा स्वास्…
सकाळी 6 वाजून 55मिनिटांनी घेतला अखेरचा स्वास…
विशेष प्रतिनिधि
वर्धा –जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून जिवंत
जाळण्याच्या प्रयत्न झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला
आहे. काल रात्रीपासून तिची प्रकृती खालावली होती. आज
सकाळी 6 वाजून 55मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली
आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मेडिकेल
बुलेटिन जारी करून ही माहिती दिली.
नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात तिच्यावर उपचार
सुरू होते. सुरूवातील पीडित तरुणीने उपचारांना
प्रतिसादही दिला. परंतु काल रात्रीपासून तिची प्रकृती
खालावत गेली. पहाटे रक्तदाब कमी जास्त झाल्याने तिला
श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला
वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पीडित तरुणीची
मृत्यूशी झुंज संपली आणि आज तिचा मृत्यू झाला.